भारत हा जगातील सर्वात जास्त तरूण लोकसंख्या असणारा देश आहे. भारताच्या विकासात तरूण वर्गाचा महत्त्वाचा वाटा असायला हवा. पण बराच तरूण वर्ग वाईट सवयींच्या आहारी गेलेला दिसत असल्यामुळे तरूण वर्गाची उत्पादकता कमी होत चालली आहे. त्याचा परिणाम वेळेच्या नियोजनावरही होत आहे. प्रत्येकाचं वेळेच्या व्यवस्थापनाचं नियोजन बिघडत चाललं आहे.
तुमची कामे वेळेत पूर्ण करण्याचा जादुई मार्ग – हॉफ्सटॅडर सिद्धांत
आपण बऱ्याच वेळा, काही काम करताना सोशल मिडीयाला दूर ठेवू शकत नाही?
बऱ्याच दिवस चालणा-या कामांसाठी स्वत:ला मानसिक रित्या तयार करणे कठीण वाटत आहे का?
कामावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही का?
वरील सर्व प्रश्नांच उत्तर जर ‘हो’ असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. स्वत:ला गुंतवून ठेवणे, उत्पादकता राखणे या गोष्टी कठीण झाल्या आहेत. हल्ली लक्ष विचलित होण्यासाठी एक क्लिकचा पुरेसा आहे. पण थोडी जागरूकता असेल, तर या गोष्टी सहज सुधारता येतात.
या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे
वाईट सवयींमुळे उत्पादन क्षमतेवर होणारे परिणाम-
- असं म्हटलं जातं की, “माणूस हा सवयीचा गुलाम आहे “चांगल्या सवयी अंगीकारल्या, तर प्रगती निश्चित साधता येते. पण वाईट सवयींमुळे आपल्याला कुचकामी ठरवण्यात येते.
- वाईट सवयींमुळे आपण कधी आणि कसे मागे पडलो हे मात्र त्यावेळी आपल्याला समजत नाही. ब-याचदा वेळ निघून गेल्यावर समजतं की, याचा वाईट परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर झाला आहे.
आपल्या वाईट सवयी काय आहेत तेच आपल्याला समजत नाही-
- वाईट सवयी कोणत्या? याबद्दल विचार केला, तर लक्षात येते की अशा सवयी ज्या सवयींमुळे विचार करण्याची प्रक्रियाच कमी झाली आहे.
- ज्या सवयीमुळे एखादी वाईट घटना किंवा आघात होऊ शकतो.
- अशा सवयी ज्यांच्यामुळे एकूण कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो.
वेळेच्या नियोजनासाठी पार्किन्सनचा सिद्धांत
आपल्या वाईट सवयी शोधून त्यावर उपाय शोधणे
- समस्या काय आहे हे ओळखून त्यामागचे कारण शोधणे ही पहिली पायरी, तर त्या समस्येवर उपाय शोधणे ही दुसरी पायरी.
- अनेकदा स्वतःलाच तपासून पाहणे कठीण असू शकते, म्हणून आत्मपरिक्षण करण्यासाठी खाली काही वाईट सवयींची माहिती एकत्रितपणे देण्यात आली आहे, त्यानुसार आपण स्वतःला ओळखून हवे ते बदल करू शकता.
कार्यक्षमता घटविणाऱ्या वाईट सवयी:
१. एकाचवेळी ब-याच साधनांचा वापर करणे टाळा-
- उत्पादकता वाढविण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी साधने महत्त्वाची असतात, साधनांचे वेगवेगळे प्रकारही उपलब्ध आहेत.
- पण एका कामासाठी बरीच साधने वापरली तर ती हाताळण्यातच बराच वेळ निघून जातो पण ते काम वेळेत पूर्ण होत नाही.
- अनेक कामे पूर्ण करणारी साधने निवडा. एव्हरनोट सारख्या साधनाचा वापर करून आपली कामे एकत्रित करा.
- संकलित किंवा संलग्नित साधने वापरा. एकाचवेळी वापरात असणारी साधने एकमेकांना सहज जोडण्यात येतील अशा साधनांची निवड करा.
या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य
२. अति माहिती धोकादायकच –
- काही वेळा एखादं काम करताना त्याविषयी बरीच माहिती आणि पर्याय मिळतात अशा वेळी गोंधळ होऊ शकतो. कदाचित तुम्ही गोंधळू शकता किंवा अति माहिती मिळाल्यामुळे आनंदही वाटू शकतो. याचा परिणाम उत्पादकतेवर निश्चित होतो.
- भरमसाठ माहितीमध्ये जे महत्वाचे आहे ते निवडा. माहिती जास्त असली की ओव्हरलोड होणे सहाजिक आहे पण त्यातील महत्त्वाची माहिती अधोरेखित करा व उर्वरित माहिती गाळून टाका.
३. अपयशाचा सामना करा –
- आपल्या चुका स्विकारून त्या दुरुस्त करणे हे परिपूर्णतेपेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून आपणं सतत निरिक्षण करायला हवं. त्यातूनच चुका लक्षात येताच व दुरूस्तीही.
४. वाईट सवयींबद्दल स्वत:लाही शिक्षा न देणे
- सकारात्मक गोष्टी सहजी साध्य होत नाहीत. त्यापेक्षा प्रत्येक वाईट सवयीसाठी स्वत:ला शिक्षा दिली तर, चांगल्या सवयी आपोआप मार्गी लागतात.
- शिक्षा अशी घ्या जी खरंच शिक्षा आहे, असं वाटलं पाहिजे व कामात विलंब होणार नाही. यामुळे स्वत:साठी एक शिस्तबद्ध कामाची पद्धत राहील, व याचा सकारात्मक परिणाम उत्पादकतेवर होईल.
कसे कराल ऑफिसच्या कामांचे नियोजन?
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/