Browsing Tag
शेअर मार्केट
49 posts
यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये- भाग १
Reading Time: 2 minutesजेव्हा कधी गुंतवणूक, पैसे, संपत्ती, मालमत्ता वगैरे विषय निघतात साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर वॉरन बफेट, राकेश झुनझुनवाला वगैरे गुंतवणूकदारांची नावे येतात. या लोकांनी यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी काय केलं? त्यांच्याकडे नक्की काय अशी गुरुकिल्ली होती की ज्याने ही संपत्तीची दारं उघडली असं एक कुतूहल असतंच. तर या आणि पुढच्या लेखात आपण अशाच काही आर्थिक यशाच्या गुरुकिल्ल्यांचा उहापोह करणार आहोत.
शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग २
Reading Time: 3 minutesमागील भागात आपण शेअर बाजाराच्या इतिहासाची माहिती घेतली. या भागात आपण स्टॉक एक्सचेंज आणि ट्रेडिंग व शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. शेअर बाजाराचा गुंतवणूकदारांशी थेट व्यवहार होत नाही. स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ट्रेडिंगचा परवाना असलेल्या व्यक्तीला स्टॉकचे शेअर्स खरेदी किंवा करण्याची परवानगी दिली जाते. आपल्याला एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करावयाचे असतील, तर आपल्या ब्रोकरशी संपर्क साधावा लागतो.
शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग १
Reading Time: 3 minutesसध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्व देशांच्या शेअर बाजाराची अवस्था बिकट झाली आहे. गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. बाजाराची पडझड सातत्याने चालू आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल अगोदरपासूनच नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या आपल्या समाजात याबद्दल गैरसमज वाढत चालले आहेत. पण परिस्थिती समजून घेऊन, पूर्वग्रहदूषित विचारांना बाजूला सारून, शांत राहून बाजार वर येण्याची वाट बघत राहणे एवढेच गुंतवणूकरांच्या हातात असते. लक्षात ठेवा परिस्थिती सतत बदलत असते. उंच शिखरावर गेल्यावर खाली येण्याशिवाय पर्याय नसतो. बाजाराचेही तसेच असते. त्यामुळे घाबरून न जाता बाजार वर येण्याची वाट बघा.
प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुंतवणूक करणे झाले अधिक सुरक्षित
Reading Time: 2 minutesउद्योगातील तज्ञांच्या मते, भांडवली बाजारपेठेत यशस्वीरित्या मजल मारण्याची गुरुकिल्ली म्हणजे डेटा आणि त्यातील खाचखळगा समजून घेणे. पण हेच मुद्दे गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे कारण ठरू शकतात. कारण कोणत्याही सामान्य माणसाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरील वर्तमान आणि इतिहासातील डेटाचा अभ्यास करणे कठीण आहे. मात्र तंत्रज्ञानामुळे हा गुंता सोडविण्यास मदत झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक वित्तीय मंच गुंतवणुकीचे जग अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाणून घेऊयात या विविध मार्गांबद्दल.
आर्थिक नियोजन – भाग ४
Reading Time: 3 minutesदरवर्षी जगभरात खाद्यपदार्थांच्या ३०,००० जाहिराती फक्त लहान मुलांना आकृष्ट करण्यासाठी बनविल्या जातात. यांत मग रेडी टू इट(फ्रोझन) पासून दुधातून घेण्याच्या सो कॉल्ड हेल्दी ड्रिंक्सपर्यंत या जाहिराती असतात. त्याचे विपरित परिणाम आता सर्वत्र जाणवू लागले आहे. ओबेसिटी (लठ्ठपणा) हा आजार आहे, हे आता जगन्मान्य झाले आहे. १९७५ साली १ कोटी बालकांना असलेला लठ्ठपणा हा विकार आज ११ कोटी बालकांना झाल्यावर त्याचे आजारात रुपांतर झाले आहे. आजच्या लेखात तुम्ही कुठल्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा? यापेक्षा तो असणे आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे, हे सांगणे जास्त उचित आहे असे मला वाटते.
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी
Reading Time: 2 minutesस्टॉक मार्केट म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भरघोस परतावा किंवा प्रचंड नुकसान. अनेकदा पूर्वग्रहदूषित नजरेने आपण स्टॉक किंवा शेअर्स खरेदीकडे बघत असतो. परंतु, तुमच्याकडे स्टॉक निवडण्याचे योग्य कौशल्य आणि सतत देखरेख करण्यासाठी वेळ असेल, तर तुम्ही स्टॉकमार्केट म्हणजे शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करू शकता.
‘क्रिसिल’ म्युच्युअल फंड पतमानांकनात ‘एलआयसी’ म्युच्युअल फंडाची’ बाजी
Reading Time: 2 minutesगुंतवणूकदारांनाही अशा कालावधी मध्ये योग्य योजनांची निवड करणे कठीण होऊन जाते. बाजारातील काही पतमानांकन संस्था आणि संशोधन संस्था निरनिराळे मापदंड वापरून योजनांची क्रमवारी नियमित जाहीर करीत असतात. क्रिसिल ह्या पतमानांकन करणाऱ्या संस्थेची डिसेंबर महिनाअखेरची क्रमवारी जाहीर झाली. समभाग संबंधित योजनांच्या क्रमवारीत एलआयसी म्युच्युअल फंड’च्या योजनांनी अतिशय सुरेख कामगिरी दाखविली. तब्बल ५ समभाग संबंधित योजनांनी CPR -१ हे उच्च रेटिंग प्राप्त केले.
आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस
Reading Time: 3 minutesया व्यवसायात झालेल्या मूल्यवृद्धीचा फायदा घेण्यासाठी आणि भांडवल उभे करण्यासाठी एस.बी.आय. कार्ड्स आपला आय.पी.ओ. शेअर बाजारात घेऊन येत आहे. सेबीला दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स नुसार ९६०० कोटी रुपये गोळा केले जाणार आहेत. तुमचा पुढचा प्रश्न तयार असेल की या पैशाचे कंपनी काय करणार आहे ? यासाठी आपण एस.बी. आय. कार्ड्सचा इतिहास बघूया.
रिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक? भाग २
Reading Time: 3 minutesआपल्या रिअल इस्टेट मधे गुंतवणूक करण्याच्या भावनिक निर्णयापोटी अधिक परतावा देऊ शकणाऱ्या इक्विटी या पर्यायाकडे आपले पूर्ण दुर्लक्ष होते आहे. एक गुंतवणूकदार म्हणून आपण रिअल इस्टेट मधे अनेक वर्षं वाट बघायला तयार असतो, तसाच संयम आपण शेअर मार्केट मधील किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत दाखवायला हवा