Browsing Tag
ईएमआय
10 posts
Buy your Dream Home : तरुण वयात घर विकत घेण्यासाठी ‘या’ १० स्मार्ट टिप्स
Reading Time: 3 minutesस्वतःचं घर’ विकत घेणे (Buy your Dream Home) हे प्रत्येकासाठी एक स्वप्न असतं. हे साध्य करतांना घराच्या आर्थिक परिस्थितीनुसार, प्रत्येकाला कमी अधिक संघर्ष करावा लागतो. गृहकर्ज (Home Loan) मिळवणे ही प्रक्रिया प्रत्येक वर्षी सुखकर होत असल्याने घरांच्या विक्रीमध्ये (Increase Home Selling) वाढ होताना आपल्याला दिसत आहे
इच्छा आणि गरज यामधला फरक – गोष्ट एका लॅपटॉपची!
Reading Time: 3 minutesलहानपणी ज्या गोष्टींविषयी मला प्रचंड आकर्षण आणि उत्सुकता होती, अशा गोष्टींपैकी एक असलेला लॅपटॉप काही दिवसांपूर्वी औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमधून मी विकत घेतला. दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली. ऑफिसमधील जवळच्या व्यक्तींना ‘स्विट्स’ देत असताना, एका सहकाऱ्याने मला प्रश्न विचारला, “सर, लॅपटॉप कॅश घेतला की EMI मध्ये ?” या प्रश्नाने, भूतकाळातील अनेक घटनांचा पट एका क्षणातच माझ्या डोळ्यांपुढे उभा राहिला. उत्तरादखल मी त्यांच्याकडे पाहत एक स्मित केलं आणि म्हणालो, “जेवण झाल्यानंतर (लंच टाईममध्ये) निवांत बोलूयात.” ठरल्याप्रमाणे, जेवण झाल्यानंतर त्या सहकाऱ्याचे डोळे माझ्याकडेच पाहत होते. माझं उत्तर ऐकण्याची उत्सुकता त्यांच्या नजरेतून झळकत होती. त्यांच्या या प्रश्नाला मी दिलेलं उत्तर आज इथे सांगावसं वाटतं…
कोरोना: ईएमआय भरण्यास मुदतवाढ, तुम्ही काय कराल ?
Reading Time: 3 minutesआरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २२ मे २०२० रोजी कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. कोरोनामुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला गेला आहे. आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. आपण घेतलेल्या कर्ज रकमांची परतफेड उत्पन्नाअभावी कशी करायची, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आ वासून उभा आहे. आरबीआयने पूर्वी जाहीर केलेल्या कर्ज परतफेडीच्या म्हणजेच ईएमआय मोराटोरीयम मध्ये अजून ३ महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
RBI – आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा
Reading Time: 2 minutesरिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतल्या महत्वाच्या घोषणा : रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात. बँकेचा रेपो दर आता ४.४% वरून ४% झाला आहे. परिणामी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. ६ जून रोजी आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे पण त्याआधीच व्याजदर कपात करून सामान्य कर्जदारांना दिलासा दिला गेला आहे.
लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल
Reading Time: 5 minutesलॉकडाऊन मध्ये अनेकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत याची काळजी आणि एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येणाऱ्या नैराश्याने ग्रासलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसिद्ध बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर “चकोर गांधी” यांनी लॉक डाऊन मध्ये बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक नियोजन व गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन करणारा ऑडिओ आम्ही ऑडिओ आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपात प्रकाशित करत आहोत.
रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती
Reading Time: 2 minutesरिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ? यासाठीचा कालावधी कोणता आहे ? कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
तणावमुक्त गृह कर्जाने बनवा आपल्या मालकी हक्काचे घर
Reading Time: 3 minutesआपण नोकरीला लागलो की आपलं पहिलं स्वप्न असतं , ते म्हणजे शक्य तितके लवकर आपले स्वतःचे घर विकत घेण्याचे. अशावेळी नोकरीच्या सुरवातीच्या काळात पैशाची थोडीफार जमवाजमव केल्यानंतरही, प्रत्येकालाच गृह कर्ज घेण्याची गरज भासतेच. काही जण गृहकर्जाच्या मोठाल्या मासिक हप्त्याने घाबरतात. माझा स्वतःचा अनुभव आहे की आपण घर कर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे कारण ८.१५ ते ८.४० % इतक्या कमी व्याजाने, तेही अगदी २०-२५ वर्षे मुदतीचे गृह कर्ज, गृहनिर्माण कर्ज कंपनी आपल्याला देते. २०-२५ वर्ष इतक्या दीर्घ मुदतीमध्ये भरावयाचा कर्जाचा हप्ता नक्कीच आपल्याला तणावाखाली ठेवतो.
गृहकर्ज परतफेडीचे विविध पर्याय
Reading Time: 4 minutesआपल्या घरकुलाचे स्वप्न घेऊन अनेक जणांनी गेल्या आठवड्यात ‘बीकेसी’तील स्थावर मालमत्ता प्रदर्शनास भेट दिली. तिथे मुंबई ग्राहक पंचायतीने, ग्राहक जागृती आणि शिक्षणासाठी जे दालन सजवले होते, त्याचा लाभ अनेकांनी घेतला. प्रश्न विचारले समस्या सांगितल्या. मालमत्तेच्या किमती पाहता कर्जाशिवाय मालमत्ता खरेदी करणे जवळपास अशक्यच आहे. असे गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या, बँका, एकसमान मासिक हप्त्याने कर्ज फेडण्याशिवाय कर्ज परतफेडीचे विविध पर्याय उपलब्ध करून देत आहेत त्यातील फरक आणि बारकावे समजले तर निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. तेव्हा या पर्यायांचा तुलनात्मक आढावा घेण्याचा हा प्रयत्न.
ऋण व्याजदराने गृहकर्ज?
Reading Time: 2 minutesघरांच्या वाढलेल्या किमती आणि त्यावरील व्याज यामुळे घर घेणाऱ्याची सर्व मिळकत पणास लागते. आयुष्यातील उमेदीची वर्ष फक्त कर्ज फेडण्यासाठी खर्च होतात, इतर खर्चाना मुरड घालावी लागते. जरी हे कर्ज ८.५% दराने इतक्या कमी व्याजदराने घेतले तरी १ लाख रुपये कर्ज १० वर्षात फेडण्यासाठी साधारणत: दीड लाख, २० वर्षात २ लाख १० हजार तर, ३० वर्षात २ लाख ७५ हजार रुपयांची परतफेड करावी लागते.