अमेरिका-चीनमधील तणावाचे बाजारावरील परिणाम

Reading Time: 2 minutes अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी चीनने ही महामारी पद्धतशीरपणे रुजवल्याचे पुरावे असल्याचे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये तणावातून युद्ध भडकले असताना सोमवारी स्पॉट गोल्डच्या किंमतीत ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली. आजच्या लेखात आपण अमेरिका-चीनमधील तणावाचे शेअर बाजारावर झालेल्या परिणामांची माहिती घेऊया.

आमुलाग्र बदलांना रोखणारी दुर्मिळ संधी !

Reading Time: 5 minutes जेवढे संकट मोठे, तेवढे धोरणात्मक तसेच दिशाबदल करणारे निर्णय घेण्याची धोरणकर्त्यांना संधी अधिक. कोरोना साथीच्या अभूतपूर्व संकटाने भारतासमोर अनेक आव्हाने उभी केली असतानाच ही दुर्मिळ संधीही आणून ठेवली आहे. अनेक समस्यांचा गुंता सोडविताना देशाला अनेक दशकांची जी अडगळ सतत रोखत होती, ती अडगळ या संकटाने दूर केली असून अर्थक्रांतीने प्रस्तावित केलेल्या अशा आमुलाग्र बदलांचा मार्ग अधिकच प्रशस्त केला आहे. 

लॉकडाऊनचे रिअल इस्टेटवर होणारे परिणाम

Reading Time: 8 minutes रिअल इस्टेट उद्योग हा अनाथासारखा आहे (कुणी “माय बाप” नाही) व याच्याशी संबंधित बहुतेक घटकांसाठी घरून काम करणे शक्य नाही; म्हणजे जोपर्यंत आपण व्हर्च्युअल घरे बांधून त्यात लोकांना व्हर्च्युअली राहायला सांगून त्याचे बिट-कॉईनमध्ये पैसे घेई पर्यंत तरी नक्कीच नाही! कोरोना विषाणू ज्या वेगानं पसरतोय त्याचं गांभीर्य मला समजतंय पण त्याचवेळी लॉकडाऊनमुळे गरीबांचा मानसिक व आर्थिक ताण वाढतोय (रिअल इस्टेट तसंच इतर सर्व उद्योगांमधल्या) या वस्तुस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, एवढाच मुद्दा मला मांडायचा आहे.

फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया – जरा चुकीचे, जरा बरोबर…

Reading Time: 3 minutes शुक्रवारी फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया म्युच्युअल फंड या आघाडीच्या घराण्याने त्यांच्या रोखे गटातील ६ योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आजवर पतसंस्था, बँका ठेवीदारांचे पैसे देत नाही, हे सर्वसामान्य लोक ऐकून होते. पण सर्वोत्तम तरलता देणारी गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड अशी बिरुदावली असलेल्या योजना जेव्हा लॉक डाऊन होऊ लागतात तेव्हा सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे?

शेअर बाजार- आयटी क्षेत्र जोमात तर बँकिंग, वाहन आणि ऊर्जा क्षेत्राला फटका

Reading Time: 2 minutes भारतीय शेअरबाजारात मागील आठवड्याची सुरुवात एका रोमांचक ट्रेंडिंग डे ने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये अस्थैर्य दिसून आले. संपूर्ण सत्रात चढ-उतार पहायला मिळाला. सोमवारी ट्रेंडिंगचा परिणाम असा झाला की, दोन्ही बाजार पुन्हा आपापल्या स्थानी पोहोचले. अखेर सेन्सेक्स ३१,६४८ अंकांवर थांबला तर निफ्टी फ्लॅट होऊन ९,२६१ अंकांवर बंद झाला.

आली सर्वांनी तुलनात्मक ‘गरीब’ होण्याची वेळ !

Reading Time: 5 minutes कोरोना साथीच्या संकटातून बाहेर पडल्यावर एक समस्या आवासून उभी असेल ती म्हणजे वाढती बेरोजगारी ! या समस्येला कसे सामोरे जायचे, याचे मंथन समाजात सुरु आहे. सर्वांनी तुलनात्मक ‘गरीब’ होण्याचा हा अभूतपूर्व मार्ग या संकटातून बाहेर पडण्याचा खात्रीचा मार्ग ठरू शकतो. यमाजी मालकर यांनी लिहिलेला हा  माहितीपूर्ण लेख आम्ही लिखित आणि दृकश्राव्य म्हणजेच व्हिडीओ स्वरूपात प्रसिद्ध करत आहोत.

Financial crisis – आर्थिक संकटांचा पुनर्विचार

Reading Time: 3 minutes संभाव्य आर्थिक संकटे या विषयावरील मागील एका लेखात नोकरी किंवा व्यवसाय करीत असताना येऊ शकतील अशा संभाव्य आर्थिक संकटावर थोडक्यात विचार करून काही उपाययोजना सुचवल्या होत्या. संकटे इतकी अचानक येतात की त्यावर काही विचार करण्यासही पुरेसा वेळ मिळत नाही. कोविड १९ हे एक महाभयंकर संकट असून त्याची थोडीशी जाणीव आपल्याला होयला १५ मार्च उजाडायला लागली. त्यापूर्वी दोन महिने आधी कोणी याबाबत सांगितले असते तर सर्वांनी त्याला मूर्खांत काढले असते.

कच्चे खनिज तेल खरेदी केल्याबद्दल खरेदीदाराला पैसे?

Reading Time: 2 minutes कोविड-१९ या महासंकटामुळे अनेक देश लॉकडाऊन झाल्याने वाहतूक मंदावली त्यामुळे मागणीत खूप मोठी घट झाली साहजिकच याचा परिणाम कच्या तेलाच्या (Crude Oil)  मागणीवर होऊन जगाच्या इतिहासात प्रथमच कच्या तेलाची वायद्यातील किंमत प्रति बॅरल शून्य डॉलरच्या खाली गेली. याचा अर्थ आता पेट्रोलियम पदार्थ फुकट मिळतील असा नसून जगभरात मंदीमुळे  मागणीत मोठी घट झाल्याने कच्चे तेल साठवून ठेवण्याची क्षमता संपली असून, आता हे उत्पादक ग्राहकांना कच्चे तेल नेण्याबद्धल पैसे देऊ करीत आहेत.

पुन्हा एकदा सुरक्षित गुंवतणुकीकडे कल, पिवळ्या धातूची चमक कायम !

Reading Time: 2 minutes कोव्हिड-१९ या आजाराचा विळखा वाढत जातोय, त्यामुळे अशा वातावरणात तीव्र झटका टाळण्यासाठी गुंतवणूकदार कमोडिटीजबाबत आक्रमक खेेळी करणे टाळत आहेत. सर्वच मोठ्या देशांनी अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी उपाययोजना केली असली तरी सर्व औद्योगिक कामकाज सुरळीत सुरु होण्यासाठी काही कालावधी लागेल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटतोय.

दिवस असे की कोणी माझा नाही….

Reading Time: 4 minutes कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसंपदा टिकली पाहिजे याला प्राथमिकता देऊन सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. परंतु कोरोना नावाचा इंडिकेटर बाजारात गुंतवणूकदारांची धनसंपदा अस्थिर करत आहे. खरंतर समभाग गुंतवणूक म्हणजे अस्थिरता आलीच. अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी धास्तावून जाण्याची गरज नाही. परंतु ज्यांनी आपत्कालीन निधीची तरतूद न करता दीर्घ मुदतीची गुंतवणूक सुरु केली असेल, त्यांना दोनच पर्याय उपलब्ध होऊ शकतात. पहिला पैशांची तरलता हवी असल्यास भांडवली तोटा सहन करणे किंवा आहे ती गुंतवणूक थांबवून पैसे न काढणे.