लॉकडाऊनच्या काळात स्वत:ला शांत व आनंदी कसे ठेवाल?

Reading Time: 2 minutesकोरोना या संसर्गजन्य रोगाने सगळीकडे निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. मानवी आयुष्यात अनिश्चितता आली आहे. जगभरातील सर्व देश या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लढत आहेत.सतत त्याच त्याच गोष्टी ऐकून मनाचा गोंधळ होऊ शकतो. आयुष्यात १००℅ सुखी झालात तर मग ते आयुष्य कसलं, नाही का? पण या भयावह परिस्थितीत आपण शांत व आनंदी राहण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या. 

कोरोना – रिझर्व बँकेकडून अर्थव्यवस्थेस दुसरा बूस्टर डोस

Reading Time: 2 minutesआरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी २७ मार्च नंतर लगेचच २० दिवसांनी भारतीय अर्थव्यवस्थेस दुसरा बूस्टर डोस पाजला आहे. कोविड -१९ संकटाशी सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येतील असे यापूर्वीच आरबीआय कडून जाहीर करण्यात आले होते. यामुळे होणाऱ्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ९० तज्ञाची कमिटी (war room) स्थापन करण्यात आली आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय व त्याचे परिणाम-

सरकारी अल्प बचत योजनांचे दर १% पेक्षा अधिक खाली

Reading Time: 5 minutesकोविड-१९ आपत्तीचा सामना करण्याकरिता सरकारने आर्थिक उपाय योजना जाहीर केल्या, त्याच बरोबर आरबीआयने रेपो व्याज दर खाली आणून ४.४०% पातळीवर आणले. ह्याचा उद्देश एकच की बँकांना आणि व्यवसायांना आवश्यक निधी स्वस्तात उपलब्ध व्हावा जेणे करून आपत्तीच्या काळात त्यांच्याकडे आवश्यक तरलता राहील. आरबीआयने आपले रेपो व्याज दर कमी केल्यावर आता बँकाही आपले टर्म डिपॉजिटचे दर कमी करतील त्याच बरोबर ज्यांनी गृहकर्ज घेतले असेल त्यांचे व्याज ही कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल. मात्र जे गुतंवणूकदार आतापर्यंत फक्त जोखीम नसलेल्या बँकेच्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करीत आले त्यांना आता गुंतवणुकीचे दुसरे पर्याय पाहावे लागतील. 

 कोरोना -अभूतपूर्व, अमुलाग्र धोरणात्मक बदलांची अपरिहार्यता आणि संधीही !

Reading Time: 4 minutesकोरोना साथीचे संकट जगाच्या व्यवहारात आमुलाग्र बदल घडवून आणणार आहे. अशा अनेक बदलात मानवी प्रतिष्ठेचा बळी जाण्याची शक्यता आहे. तो तसा जायचा नसेल तर समाज आणि सरकारांना अभूतपूर्व आमुलाग्र अशा धोरणात्मक बदलांचा अवलंब करावा लागेल. कोणते आहेत असे दिशादर्शक बदल? 

“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesकोविड-१९ कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अनेक उद्योग- व्यवसाय बंद आहेत. शक्य ते व्यवसाय घरून ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. नोकरदार वर्गालाही घरून ऑनलाईन काम करावे लागत आहे (Work From Home). याच वर्क फ्रॉम होम मध्ये सर्वांत जास्त गाजलेले मोबाईल ॲप आणि सॉफ्टवेअर म्हणजे ‘झूम ॲप. झूमचा वापर करून मिटींग कशी घ्यायची? झूम सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नापास का ठरते ? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया –

कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा

Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा लक्षात घेता, हे लॉकडाऊन अजून वाढवण्यात आले आहे. हा वेळ म्हटलं तर सक्तीचा आणि कंटाळवाणा वाटू शकतो आणि म्हटलं तर याचा सदुपयोगही करता येऊ शकतो. वेबसिरीज, सिनेमे यामुळे वेळ छान जातही असेल, पण या काळात काही आर्थिक नियोजन करता येतं का? याकडेही लक्ष देऊ या.  या लॉकडाऊनच्या काळात, कोणत्या आर्थिक बाबी पहायला हव्यात, याबाबत या लेखातून जाणून घेऊ. 

कोरोना – “देवाची करणी” आणि विमा योजना

Reading Time: 4 minutesकोरोना विषयक माहितीच्या महापुरात आयआरडीए ने कोरोनाचे क्लेम्स मान्य करण्यासंबंधी एक सर्क्युलर काढले आहे. अशी माहिती समाज  माध्यमांतूनही फिरत होतीच. या बाबत अनेकांचा गोंधळ उडाल्याने माझे आकलन येथे स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते. आयआरडीएने प्रसिद्ध केलेले, कोरोनाचे क्लेम्स मान्य करणेसंबंधीचे परिपत्रक हे प्रामुख्याने ‘आरोग्य विमा’ (Medical Insurance) सेवांबाबत आहे.

कोरोना, आर्थिक पॅकेज आणि ईपीएफचा संभ्रम

Reading Time: 2 minutesकेंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी कोविड १९ च्या संकटामुळे आघात झालेल्या उद्योग, व्यवसायांना थोडासा दिलासा देण्याच्या उद्देशाने आर्थिक सवलतींचे पॅकेज जाहिर केले. शंभर किंवा त्याच्या आता संख्या असलेल्या (त्यातील किमान ९०% संख्या ही १५,००० किंवा त्यापेक्षा कमी मासिक वेतन घेणारी असावी), कामगार भविष्य निर्वाह निधी योजनेत नोंदणी असलेल्या उद्योग, व्यवसायांना आणि १५००० पेक्षा कमी मासिक वेतन असणार्‍या कामगार कर्मचाऱ्यांना सहाय्य व्हावे म्हणून तीन महिन्यांसाठी मालक आणि कामगार दोघांच्याही ईपीएफ (EPF) च्या सहभागाची रक्कम सरकार भरणार असल्याचे जाहिर केले.

बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक

Reading Time: 4 minutesगेले काही दिवस भांडवल बाजारात अस्थिरता आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक आपल्या ४२,२७४ वरून २५,६३९ तर, राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १२,४३० वरून ७,५११ पर्यंत तळ गाठून आला. जवळपास ४०% घट ही एकदम अत्यल्प कालावधीत झाली. यापूर्वीही अनेकदा ही वेळ आली आहे त्यातून बाजार सावरला आणि त्यांने पुन्हा उभारी घेतली. यातील सन २००८ मधील मंदीमध्ये निर्देशांकात ६०% घट झाली होती. देशी आणि परदेशी वित्तसंस्थाचा कल बाजारास हेलकावे देत असतो. त्यांना आपल्या गुंतवणुकीवर फक्त नफाच मिळवायचा असल्याने उपलब्ध सर्व मार्गांचा  वापर त्यांच्याकडून केला जातो. 

“वर्क फ्रॉम होम”साठी काही महत्वाच्या टीप्स

Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत संपर्काने होते. याचे तीव्र व भयानक परिणाम जगातील सर्वच देश भोगत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी अनेक कंपन्यानी त्यांच्या कर्मचा-यांनी घरी बसून म्हणजे वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगितले आहे. घरी बसूनही तुमचं काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी खालील काही टिप्स लक्षात ठेवा.