क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन  – भाग १

Reading Time: 3 minutesअसं म्हणतात की भारतामध्ये दोनच मुख्य धर्म आहेत, एक आहे-क्रिकेट आणि एक आहे-राजकारण. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये या दोन्हींचा प्रभाव पाडणे हे अगदीच अपेक्षित आहे. राष्ट्रीय खेळ असला तरीही, क्रिकेट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे क्रिकेटच्या अनुषंगाने आर्थिक क्षेत्राशी निगडित आपल्याला कोणते धडे घेता येतील, या संदर्भात या लेखांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. 

आर्थिक नियोजन – भाग ३

Reading Time: 3 minutesभारतात विमा हा सुरक्षिततेपेक्षा गुंतवणूक म्हणूनच अधिक विकला जातो. आर्थिक जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर काही दुर्दैवी प्रसंग ओढावल्यास कुटुंबाची आर्थिकदृष्टया आबाळ होऊ नये म्हणून विमा कवच असणे गरजेचे आहे. त्यामुळे कमवित्या व्यक्तीने प्रथम मुदतीचा विमा “खर्च” म्हणून विकत घ्यावा व नंतर जोखीम स्विकारण्याची क्षमता नसलेल्यांनी स्थिर अथवा खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या विमा योजनांत गुंतवणूक करावी. 

Valentine’s day: असा साजरा करा ‘अर्थ’पूर्ण व्हॅलेंटाईन डे

Reading Time: 3 minutesप्रेमाचा गुलाबी रंग ओसरल्यावर वास्तवाचा पांढरा शुभ्र कोरा कॅनव्हास समोर दिसू लागतो. या शुभ्र कॅनव्हासवर रेखाटण्यासाठी तुमच्या नात्याचं सुंदर चित्र तयार असू द्या. तुमच्या नात्याला सुंदर बनविण्यासाठी यावर्षी एक वेगळा विचार करा. तो म्हणजे “इकॉनॉमी व्हॅलेंटाईन डे”!

तणावमुक्त गृह कर्जाने बनवा आपल्या मालकी हक्काचे घर

Reading Time: 3 minutesआपण नोकरीला लागलो की आपलं पहिलं स्वप्न असतं , ते म्हणजे शक्य तितके लवकर आपले स्वतःचे घर विकत घेण्याचे. अशावेळी नोकरीच्या सुरवातीच्या काळात पैशाची थोडीफार जमवाजमव केल्यानंतरही, प्रत्येकालाच  गृह कर्ज घेण्याची  गरज भासतेच. काही जण गृहकर्जाच्या मोठाल्या मासिक हप्त्याने घाबरतात. माझा स्वतःचा अनुभव आहे की आपण घर कर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे कारण ८.१५ ते ८.४० % इतक्या कमी व्याजाने, तेही अगदी २०-२५ वर्षे मुदतीचे गृह कर्ज, गृहनिर्माण कर्ज कंपनी आपल्याला देते. २०-२५ वर्ष इतक्या दीर्घ मुदतीमध्ये भरावयाचा कर्जाचा हप्ता नक्कीच आपल्याला तणावाखाली ठेवतो. 

आर्थिक नियोजन – भाग २

Reading Time: 3 minutesशनिवारी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला. अर्थसंकल्पाची सोप्या शब्दातील व्याख्या करताना सरकारला मिळणारा कररूपी महसूल म्हणजे उत्पन्नातून भविष्यकालीन होऊ घातलेल्या खर्चाचा आराखडा. येणारा रुपया व जाणारा रुपया यांचा ताळेबंद म्हणजेच “अर्थसंकल्प” होय. बहुतेकवेळा मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च मोठे असल्यामुळे वित्तीय तूट वाढते. परिणामी सरकारला कर्जे उचलून खर्चांची पूर्तता करावी लागते.

गुंतवणुकीसाठी सल्लागार कशाला?

Reading Time: 4 minutesबऱ्याच लोकांना ‘गुंतवणूक सल्लागार’ म्हणजे नक्की काय या विषयी मोठे गैरसमज असतात. त्यांना वाटतं की हे लोक फक्त पैशांची गुंतवणूक करून देतात किंवा फक्त श्रीमंत लोकांनाच त्यांची गरज असते. प्रत्यक्षात एक गुंतवणूक सल्लागार त्याच्या क्लाएन्टना अनेक प्रकारे मदत करत असतो आणि श्रीमंत लोकांपेक्षा त्यांची जास्त गरज मध्यमवर्गीयांना असते. कारण जेवढी आपली संसाधनं मर्यादित तेवढे त्यांचे नियोजन जास्त महत्त्वाचे.

तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी ठरवाल?

Reading Time: 4 minutesआपल्या भविष्यासाठी, आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे, याबद्दल कोणाचंच दुमत नसेल.  पण आर्थिक नियोजन कसं करायचं? ते करण्याची सुयोग्य पद्धत कोणती? असे अनेक प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतील. या लेखात आपण शास्त्रीय पद्धतीने करण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजनाची माहिती घेऊ. आर्थिक नियोजनाची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे ध्येयनिश्चिती किंवा आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करणे. ध्येयनिश्चिती करण्याच्या पाच महत्वाच्या पायऱ्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक पायरीवर जरा थांबून विचार करून, मगच पुढच्या पायरीवर जायचे आहे.

Kakeibo: आर्थिक नियोजनासाठी पारंपरिक जपानी पद्धत ‘काकेइबो’!

Reading Time: 3 minutesहिशोब करण्यासाठी कोणत्याही खास तंत्राचा वापर केला जात नसे शिल्लक असलेल्या पैशात आलेले पैसे मिळवून ते वहीच्या डाव्या बाजूला तारखानुसार जमा दाखवले जात, तर त्यातून काय खर्च केला त्याचा तपशील उजवीकडे लिहून त्याची बेरीज केली जाई. जमा रकमेतून खर्च वजा करून शिल्लक पुढील तारखेस ओढून त्या दिवसाचा खर्च लिहिला जात असे. पैसे येण्याचे प्रमाण अगदी कमी प्रामुख्याने पगार अथवा वसूल उधारी असे, तर खर्च करताना अत्यावश्यक खर्च करायलाच पाहीजे ही भावना असून त्यानुसार नियोजन केले जात असे. 

मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता

Reading Time: 2 minutesमोबाईल हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी बँकिंग पासून डेटिंग पर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर सहज शक्य होत आहेत. मोबाईलमुळे आयुष्य सुखकर झाले आहे. कुठलीच गोष्ट १००% चांगली किंवा वाईट नसते. त्याचप्रमाणे मोबाइलचेही अनेक तोटे आहेत.  मोबाईलमुळे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. तसेच, हा मोबाईल तुमच्या सामाजिक आयुष्यावर, तुमच्या कार्यक्षमतेवर, तसेच तुमच्या आर्थिक नियोजनावरही विपरीत परिणाम करतोय हे तुम्हाला माहिती आहे का? 

गुंतवणूक नियोजन: अनिश्चित उत्पन्न आणि गुंतवणूक नियोजनाच्या ५ स्टेप्स

Reading Time: 3 minutesकाही वेळा व्यवसायामध्ये एवढी अनिश्चितता असते की यातून वार्षिक खर्चाची भरपाई होत असली, तरी ज्या किमान रकमेची गुंतवणूक व्हायला हवी ती त्यांच्याकडून होऊ शकत नाही किंवा असे काहीतरी करता येऊ शकेल का? या दृष्टिकोनातून ते विचारच करीत नाहीत. याची अनेक कारणे असली भविष्यकाळाचा विचार करून काही रक्कम वेगळी व बाजूला ठेवणे जरुरीचे असते.