दसऱ्याला करा दहन या दहा आर्थिक सवयींचे!

Reading Time: 4 minutes आज दसरा! दसरा हा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आजच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि युद्ध जिंकले, त्यामुळे आज रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. खरंतर रावण हा अत्यंत हुशार, शूर आणि श्रीमंत होता. परंतु त्याचा अहंकार, अट्टाहास त्याच्यासाठी काळ बनून आला. त्याला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला नाही. त्यामुळे शेवटी तो विनाशाच्या मार्गाला गेला. रावणाची प्रतिमा दहन करण्यामागे, “आपल्या मनातील वाईट भावनांचे दहन करणे” हा मुख्य उद्देश आहे. आपल्या मनात अशा अनेक भावना, इच्छा असतात ज्या आपल्यासाठी घातक ठरू शकतात. तसंच, आपल्या काही सवयी आपल्या आर्थिक स्थितीसाठीही घातक ठरू शकतात. आजच्या लेखात जाणून घ्या रावणाच्या दहा तोंडांप्रमाणे असणाऱ्या आपल्या दहा सवयी, ज्यांचं दहन करणं आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे.

कर्जमुक्त कसे व्हावे – भाग २

Reading Time: 4 minutes कर्जमुक्तीसाठी नेमके काय करावे? हा प्रश्न नेहेमी सर्वांना पडलेला असतो. त्याचाच वेध घेणाऱ्या लेख मालिकेतील हा दुसरा लेख. खर्च करण्यासाठी किंवा एखादी मालमत्ता विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतील तर बँकांकडून कर्ज घेतले जाते. याबदल्यात मासिक परतफेड मात्र व्याजासहित करावी लागते.“आपल्याला गरज आहे म्हणून कर्ज घ्यायचे की बँक कर्ज देते आहे म्हणून आपल्या अनावश्यक गरजा वाढवायच्या?”  याचा विचार न करता घेतलेले कर्ज तुम्हाला “कर्जबाजारी” बनवते.

क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?: भाग २

Reading Time: 3 minutes आपल्या क्रेडीट कार्डचा सजग वापर करावा. कार्डचा वापर झाल्यावर आपल्या  पाकिटात कार्ड ठेवले गेले आहे का याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याचदा खर्च करताना लक्षात येते की आपले क्रेडिट कार्ड मागच्या वेळेस पेट्रोल पंप किंवा दुकानदाराला  दिल्यावर आपण परत घ्यायचे विसरलो म्हणून!

क्रेडिट कार्डमुळे सिबिल स्कोअर खालावतो का?

Reading Time: 2 minutes सिबिल स्कोअर चांगला असणे हे ती व्यक्ती आर्थिक बाबतीत शिस्तप्रिय व जबादार असण्याचं लक्षण आहे. पण प्रत्येक जबाबदार व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगलाच असेल असे नाही. आपल्याही कळत-नकळत बऱ्याचदा आपण अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे सिबिल स्कोअर खालावतो याची आपल्याला कल्पनाच नसते.

क्रेडिट कार्ड आणि सिबिल स्कोअर

Reading Time: 2 minutes कोणत्याही प्रकारचं कर्ज घेताना आपला सिबिल स्कोअर महत्त्वाचा असतो. हा स्कोअर आपल्या कोणत्याही एकाच व्यवहारावर ठरत नसतो. आपला सिबिल स्कोअर म्हणजे आपण सातत्याने करत आलेल्या सर्व आर्थिक उलाढालींचा एकत्रित परिणाम असतो. या स्कोअरवर कर्ज मंजूर वा नामंजूर होणे अवलंबून असते. हा स्कोअर खराब असल्यास आपण कर्ज घेण्यास पात्र ठरण्यासाठी तो सुधारायला साधारण ४ ते १२ महिने लागू शकतात.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?

Reading Time: 2 minutes क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? क्रेडिट कार्ड कसे काम करते, वापराचे फायदे-तोटे काय आहेत हे सोप्या शब्दांत या लेखात जाणून घ्या.

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

Reading Time: 3 minutes सुरूवातीला क्रेडिट कार्ड हे वापरण्यास सरळ व सोपे वाटत असते. परंतु, क्रेडिट कार्डच्या वापरात अनेक छुपे खर्च लावण्यात आलेले असतात, ज्याची माहिती आपल्याला नसते.  क्रेडिट कार्डवर वेगवेगळ्या प्रकारचे कर व फी आकरली जात असते. जसे की, उशीर केलेले देय, क्रेडिट कार्ड घेतानाची फी, नुतनीकरणाची फी आणि प्रक्रिया शुल्क असे वेगवेगळे छुपे खर्च कार्डवर लावले जातात.

क्रेडिट कार्ड वापरण्याचे ९ महत्वाचे फायदे

Reading Time: 3 minutes तुम्ही देखील क्रेडिट कार्डचा वापर करता का? जर हो, तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. हो, पण त्याच बरोबर क्रेडिट कार्डचा वापर करताना काळजी घेणे देखील गरजेचे आहे. जर क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला तर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात देखील अडकू शकता. या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाऊ नये याच कारणामुळे अनेक जण डेबिट कार्ड वापरणे पसंत करत असत. परंतु आज अनेक जण क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्ड वापरताना त्याचा वापर सुयोग्य पध्दतीने करणे गरजेचे असते. क्रेडिट कार्ड वापरण्याचे काय फायदे आहेत ते पाहुया.