जुलै २०१९ ला जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले होते. करवसुली, करबुडाव्यांना चाप, पारदर्शी व्यवहार ही प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून नियमांची आखणी करण्यात आली होती.
- आयकर विवरण पत्र म्हणजे आयटीआर (ITR) संदर्भात अनेक नवीन नियमांची भर पडली आहे. तसेच, पॅन आधार जोडणीही बंधनकारक करण्यात आली आहे.
- नवीन नियमांमुळे नागरिकांनी गोंधळून जायचे काहीच कारण नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे.
- काही नवीन नियमांनुसार करपात्र उत्पन्न नसणाऱ्या नागरिकांनाही आयटीआर दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांकडे पॅन कार्ड नसेल तर आधार कार्डच्या साहाय्याने आयटीआर दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.
- आधार पॅन जोडणी कायद्याने बंधनकारक करण्यात आली आहे. भारत सरकारने आत्तापर्यंत १२० कोटी आधार क्रमांक जारी केले आहेत, तर या तुलनेत पॅन कार्ड धारकांची संख्या मात्र ४१ कोटी आहे.
- त्यामुळे पॅन क्रमांकाअभावी आयटीआर दाखल करण्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून नागरिकांना आधार क्रमांक वापरून आयटीआर दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- कायद्यानुसार कर निर्धारण अधिकाऱ्यांना पॅन क्रमांक जारी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आधार कार्डच्या साहाय्याने आयटीआर दाखल करणाऱ्या नागरिकांना पॅन क्रमांक जारी केला जाणार आहे.
- आयकर विभागाने ही सुविधा १ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. पॅन आधार जोडणी बंधनकारक असल्यामुळे आधार क्रमांक टाकून आयटीआर भरणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डमधील माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा पॅन क्रमांक तयार करण्यात येईल.
- आधार कार्डमध्ये व्यक्तीची संपूर्ण माहिती नमूद केलेली असते. ही माहिती पॅन कार्ड जारी करण्यासाठी वापरण्यात येईल. याबाबतची अधिसूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळामार्फत ३० ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे.
- आधार कार्डच्या सहाय्याने आयटीआर दाखल करणाऱ्या नागरिकांना पॅन क्रमांक मिळविण्यासाठी कोणतीही कागदपत्रे करदात्याला सादर करावी लागणार नाहीत. तसेच, पॅन क्रमांक मिळविण्यासाठी वेगळा अर्ज दाखल करण्याचीही आवश्यकता नाही. हा नियम १ सप्टेंबरपासून अमलात आला आहे.
आत्तापर्यत एकूण २२ कोटी पॅन क्रमांक, आधार क्रमांकाला जोडण्यात आले आहेत. १ जुलै २०१७ पर्यंत ज्या नागरिकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे, त्या सर्व नागरिकांनी प्राप्तिकर कायदा कलम १३९ एए (२) अन्वये आधार क्रमांक प्राप्तिकर खात्याला कळवणे आवश्यक आहे किंवा पॅन आधार जोडणी करणे आवश्यक आहे.
१ सप्टेंबरपासून बदललेले आयकराचे ८ महत्वपूर्ण नियम तुम्हाला माहिती आहेत का?
पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल
बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’
१ सप्टेंबर पासून बँकांच्या नियमांमध्ये होणारे महत्वपूर्ण बदल
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.