मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट ! 

Reading Time: 3 minutesकोरोना विषाणू चीनमध्ये कसा उत्पन्न झाला, तो जगात आणखी किती जणांचे बळी घेणार, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था उध्वस्त होणार का, या साथीतून जगाची सुटका कशी होणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घनतेचा (दर चौरस किलोमीटरला ४२५ माणसे) विचार करता जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताचे या संकटात काय होणार, या चिंता सध्या प्रत्येकाला सतावत आहेत. मानवजातीला या अभूतपूर्व चिंतेतून दूर करण्यासाठी आणि जगाची चाके पुन्हा फिरण्यासाठी माणूस प्रयत्नशील आहे आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपला नजीकच्या काही दिवसांचा दिनक्रम ठरविणे, एवढेच आज आपल्या हातात आहे. 

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती

Reading Time: 2 minutesरिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.  कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ? यासाठीचा कालावधी कोणता आहे ? कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

कोरोना – रिझर्व्ह बँकेचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याचे परिणाम

Reading Time: 3 minutesरिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिनांक २७ मार्च २०२० रोजी पत्रकार परिषद घेऊन कोविड १९ मुळे उद्भवलेल्या सध्याच्या कठीण परिस्थितीत अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत हे निर्णय कोणते व  त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल विचार करूयात.

“करोना” –  यातील काही आपण विसरलोय का?

Reading Time: 3 minutesहा लेख प्रकाशित होईल तेव्हा हे आर्थिक वर्ष (Financial Year) संपायला ४/६ दिवस उरले असतील. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षाची मुदत वाढवली आहे म्हणजेच हे वर्ष जून २०२० ला संपून, पुढील वर्ष हे ९ महिन्यांचे असेल व ते ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. त्यापुढील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असेल. हे लक्षात ठेऊन काही गोष्टी सर्वांनी अग्रक्रमाने करणे आवश्यक आहे याला मी ‘करो ना’ म्हणतोय, नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, त्या कोणत्या ते पाहुयात.

गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट – आर्थिक नियोजनाची फरफट?

Reading Time: 3 minutes“दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल…” आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानीही झाली, पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही आपण मात करण्यात आपल्याला यश मिळेल.  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरवात होते. अनेकजण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. 

“वर्क फ्रॉम होम”साठी काही महत्वाच्या टीप्स

Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत संपर्काने होते. याचे तीव्र व भयानक परिणाम जगातील सर्वच देश भोगत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी अनेक कंपन्यानी त्यांच्या कर्मचा-यांनी घरी बसून म्हणजे वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगितले आहे. घरी बसूनही तुमचं काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी खालील काही टिप्स लक्षात ठेवा. 

कोरोना व्हायरसविषयीचे ८ गैरसमज

Reading Time: 3 minutesसध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले असून भारतातही याचे अनेक रुग्ण दिसून येत आहे. जगभरात पसरलेल्या या व्हायरसबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भिती निर्माण झाली आहे. काहींनी याबाबत वेगवेगळे गैरसमजही करून घेतले आहेत.  सोशल मिडियावरून या विषयीच्या बऱ्याच बातम्या किंवा माहिती मिळत असते. पण यामध्ये बरेच गैरसमज देखील पसरवले जात आहेत. याचा चुकीचा प्रसार होऊ नये यासाठी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. 

तरुणांसाठी गुढीपाडवा व नवीन आर्थिक वर्षाचे संकल्प

Reading Time: 3 minutesसर्वसाधारणपणे उच्च शिक्षण पूर्ण होऊन नोकरी व्यवसायास सुरुवात केल्यापाऊन त्यात स्थिरस्थावर होईपर्यंत ३० वे वर्ष चालू होते. तेव्हा या वयोगटातील व्यक्तीने येणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, खरं तर कोणताही मुहूर्त न पाहता लवकरात लवकर काही नवे संकल्प करावेत. 

जीडीपीत वाढ म्हणजेच विकास, ही फसवणूकच!

Reading Time: 4 minutesजीडीपीची वाढ हाच विकास असे मानणारा आणि मानवी आनंदाकडे दुर्लक्ष करणारा पाश्चात्य अर्थविचार हाच महत्वाचा मानला गेल्याने आज देशाच्या विकासात अनेक विसंगती निर्माण झाल्या आहेत. भारत नावाच्या वेगळ्या देशाला त्याच्या प्रकृतीशी सुसंगत अर्थविचार हवा आहे. पण बहुतांश भारतीय अर्थतज्ञ पाश्चात्य अर्थविचारांच्या आहारी गेल्याने त्या विचारात १३६ कोटी भारतीयांना कोंबण्याचे पाप त्यांनी केले आहे. 

कोरोना आणि कायदा

Reading Time: 2 minutesकोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. भारत सुद्धा ह्याला अपवाद राहिलेला नाही. ह्या प्रचंड वेगाने फोफावणाऱ्या आजारावर नियंत्रण आणणे हे भारताच्या सरकारपुढे मोठे आव्हान झाले आहे आणि सरकार हे आव्हान मोठ्या शर्थीने पेलताना दिसत आहे. भारतात कुठलेही निर्णय घेण्यासाठी सरकारला कायद्याचे पाठबळ लागते. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कुठले कायदे हाताशी घेतले आहेत हे आपण ह्या लेखातून जाणून घेऊया.