Mobile Security: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

Reading Time: 4 minutes आपल्या मोबाईलवर आपण अनेक महत्वाचा व खाजगी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. यामध्ये काही आपले फोटोज व व्हिडीओजही असतात. कोणी आपली वैयक्तिक खाजगी माहिती हॅक तर करणार नाही ना? त्याचा गैरवापर तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या मनात भीती निर्माण करत असतात. ही भीती अनाठायी आहे का? तर, नक्कीच नाही. तुमची भीती योग्य आहे. पण म्हणून घाबरून मोबाईलवरून आर्थिक व्यवहार न  करणं किंवा मोबाइलचाच वापर न करणं, हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मग करायचं तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. या लेखात आपण मोबाईलला हॅकिंग पासून कसे वाचवायचे, त्याचे उपाय व करणे या महत्वपूर्ण मुद्द्यांची माहिती घेणार आहोत. 

Car Insurance Renewal: मोटारविम्याचे नूतनीकरण करताना…

Reading Time: 2 minutes तुमच्याकडे स्वतःची मोटार असेल तर तिचा विमा उतरवणे किती आवश्यक आहे, याची तुम्हाला निश्चितच जाणीव असते. त्यातच पूर्वी कधी तुमच्या मोटारीचे नुकसान झाले असेल, तर मोटार विम्यात कोणत्या गोष्टींच्या भरपाईचा समावेश आहे आणि कोणत्या नाही, याचीही तुम्हाला चांगलीच जाणीव असायला पाहिजे. 

Work Stress: कसे कराल कामाच्या ताणाचे नियोजन?

Reading Time: 2 minutes आज आपण सगळेच कामाचा ताण अनुभवत आहोत. स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु आहे. शिक्षण, क्रीडा, उद्योग, नोकरी प्रत्येक क्षेत्रात लोक तणाव, भीती, दबाव आणि त्यातून निर्माण होणारे कित्येक आजार याचा अनुभव नित्याचाच झाला आहे. चीनसारखा देश नोकरदारांना सक्तीची रजा घ्यायला लावतो इतकी कामाच्या ताणामुळे आरोग्याची वाईट अवस्था झाली आहे. कामाचा ताण येण्याचे मुख्य कारण म्हणजे दिलेल्या मुदतीमध्ये का कसे संपवावे, हा प्रश्न. अभ्यास, काम याच्या दिलेल्या डेडलाईन पाळण्यासाठी २४ तासांचा दिवस कमी पडतो. 

मराठी भाषा दिन: अर्थसाक्षरचा मराठी प्रवास

Reading Time: 2 minutes साहित्याने समृद्ध आणि श्रीमंत असणाऱ्या मराठी साहित्य जगताच्या चंद्रावरचा एक डाग म्हणजे  डिजिटल माध्यमात आर्थिक विषयांची संपूर्ण माहिती देणारी एकही वेबसाईट उपलब्ध नव्हती. इंग्रजीमध्ये यासाठी शेकडो वेबसाईट असणं काही नवीन नाही. हिंदीमध्येही अशा वेबसाइट्सची संख्या लक्षणीय आहे. मग मराठीतच फक्त ‘आर्थिक विषयासाठी’ अशी एकही वेबसाईट का नाही? असा प्रश्न आमहाला पडला. ही कमी पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आम्ही आर्थिक विषयांची माहिती संपूर्णपणे मराठीतून देणारी अर्थसाक्षर.कॉम नावाची एक वेबसाईट चालू केली.

Family Budget: घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

Reading Time: 3 minutes पहिल्याच दिवशी जे व्यायामशाळेत अति व्यायाम करतात ते आठवड्याहुन जास्त व्यायामशाळेचा उंबरठा ओलांडत नाही. आपल्या वैयक्तिक, घरघुती अंदाजपत्रकाचंही तसंच आहे. खूप डोकं लावून जटिल, किचकट बजेट तयार केलं तर ते पाळल्या जाणार नाही. सुरवातीचा उत्साह नव्याचा नऊ दिवस म्हणून उडून जाईल. यामुळे साधा सरळ अर्थसंकल्प तयार करणेच योग्य असतं. असा अर्थसंकल्प पाळणेही सोपी असतं.

Valentine week: “व्हॅलेंटाईन विक”मागचं खरं अर्थकारण

Reading Time: 3 minutes कोणत्याही जागरूक व्यक्तीला हे स्पष्टपणे कळतं की या सर्व ‘डेज’चं  योग्यप्रकारे बाजारीकरण केलं गेलंय. यामुळे या आठवड्यात होणारी बाजारातील उलाढाल बघता नात्याची वीण आता इतकी पातळ आणि वरवरची झाली आहे की फक्त गिफ्ट्स आणि डेजच्या माध्यमातूनच ती झिरझिरीत वीण अस्तित्वात राहतेय असं जाणवतं.

आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?

Reading Time: 3 minutes पेट्रोलपासून रोजगार क्षेत्रापर्यंत मंदीची झळ बसते आहे. ही घसरण किती काळापर्यंत राहील हे निश्चित सांगता येत नाही पण अशा काळात सामान्यांनी काय करावे म्हणजे मंदीची कमीत कमी झळ व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला बसेल ही विचार करण्याची गोष्ट आहे. आर्थिक मंदीला सामोरे जाणे अपरिहार्य आहे पण आता आपली भूमिका की असेल आर्थिक निर्णय घेतला कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडे बोलूया. 

Jeff Bezos: ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा मोठा निर्णय

Reading Time: 3 minutes ॲमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून  त्यांच्या जागी अँडी जेसी (Andy Jassy) नियुक्ती करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प २०२१: हलवा सेरेमनी नक्की कशासाठी साजरा करतात?

Reading Time: 3 minutes शनिवारी, 23 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील उत्तर ब्लॉक येथील केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मुख्यालयात सन २०२१ च्या अर्थसंकल्प प्रक्रियेतील अंतिम टप्पा म्हणजेच पारंपारिक ‘हलवा सेरेमनी’ आयोजित करण्यात आला होता.

Pareto principle: तुम्हाला पॅरेटो सिद्धांताबद्दल माहिती आहे का?

Reading Time: 2 minutes आल्फ्रेड पॅरेटो या अर्थतज्ञाला प्रश्न पडला की इटली मध्ये सर्वांचे उत्पन्न समान नाही हे ठीक आहे. पण या उत्पन्न विभागणीचे प्रमाण कसे आहे ते शोधूया. तेव्हा अभ्यासाअंती असे लक्षात आले की संपूर्ण इटलीतील ८०%  जमिनी केवळ २०% लोकांच्या मालकीच्या आहेत. पॅरेटो यांनी इ.स. १८९६ ला युनिव्हर्सिटी ल्युसेन येथे हा सिद्धांत मांडला. पुढे विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले की साधारणपणे मालमत्ता मालकीचा कल ८०-२० नियमानुसारच आहे.