Coronavirus and Financial Management: कोरोना संकटातही असे करा आर्थिक व्यवस्थापन

Reading Time: 3 minutes

Coronavirus and Financial Management

सध्या कोरोना संकटात जगण्याची लढाई लढताना प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे? (Coronavirus and Financial Management). पण या परिस्थितीतही आर्थिक व्यवस्थापनाला पर्याय नाही, ते करावंच लागणार आहे. या संकटात आर्थिक व्यवस्थापन करताना काही महत्वाच्या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या लागतील, तरच या संकटात आपली नाव तरून किनारा गाठू शकेल. आजच्या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

हे नक्की वाचा: नोकरी गेल्यानंतरही पैशाचे नियोजन कसे कराल?

गेल्यावर्षी आलेल्या कोरोना नामक अभूतपूर्व संकटाने जगण्याचे नियमच बदलून गेले आहेत. सगळं काही स्थिरस्थावर होतंय असं वाटत असताना अचानक आपण पुन्हा गतवर्षीच्या स्थितीत जाऊन पोचलो.  गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीची स्थिती अधिक भयावह आहे. अगोदरच कोलमडले आर्थिक व्यवस्थापन आणि अधिकच बिकट होत जाणारी परिस्थिती यामुळे प्रत्येकजण आर्थिक विवंचनेचा सामना करत आहे. पण या परिस्थितीतही सकारात्मक राहून आपल्याला आर्थिक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. कारण जगण्यासाठी सहानुभूती नाही तर पैसा आवश्यक असतो. 

Coronavirus  and Financial Management: कोरोना संकट आणि आर्थिक व्यवस्थापन

१. ताळेबंद

 • जमा खर्चाचा हिशोब मांडा. यावरून आपल्याला किती उत्पन्न वाढवायची गरज आहे हे लक्षात येईल. त्याचबरोबर अनावश्यक होणारे खर्चही लक्षात येतील व वेळीच त्याला आवर घालता येईल.
 • नकळतपणे होणाऱ्या अनावश्यक खर्चाना आवर घालणे हे अत्यंत महत्वाचे आहे. हे सर्व खूप कठीण वाटत असलं तरी अशक्य नक्कीच नाही. हा काळही सरेल आणि चांगले दिवस येतील यावर विश्वास ठेवा. 

२. बचतीची मानसीकता: 

 • पगारच पुरत नाही, तर बचत कशी करू? पगारात जेमतेम भागवतोय इमर्जन्सी फंड कसा उभारू? सध्याच्या परिस्थितीत बचत करायला जमेल का? या आणि अशाप्रकारच्या मानसिकतेमधून बाहेर पडा.
 • रोजचा जमा खर्च लिहायची शिस्त स्वतःला लावून घेतल्यास होणारा अनावश्यक खर्च लक्षात येईल.
 • सद्य परिस्थितीत प्रत्येक महिन्याला ठराविक रकमेच्या बचतीचे ध्येय निश्चित करा व त्यानुसार आपल्या खर्चाचे व्यवस्थापन करा.
 • उत्पन्न -खर्च =बचत या तत्वाऐवजी उत्पन्न -बचत = खर्च हे सूत्र अंगीकारा. परिस्थिती कठीण आहे पण बचतीला पर्याय नाही कारण सध्या सगळंच अनिश्चित आहे, पण तरीही सकारात्मक रहा. कारण नकारात्मक मानसिकतेमुळे काहीही फायदा होणार नाही. 

महत्वाचा लेख: Saving & Investment: बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक

३. विमा व गुंतवणूक: 

 • अनेकजण विमा व गुंतवणूक यामध्ये गल्लत करतात. लक्षात ठेवा विमा म्हणजे गुंतवणूक नव्हे. विमा म्हणजे तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी केली जाणारी एक तरतूद आहे, तर गुंतवणूक म्हणजे तुमच्या बचतीच्या किंवा साठवलेल्या पैशांना ठराविक मुदतीसाठी ठराविक योजनेमध्ये ठेवणे. गुंतवणुकीवर परतावा मिळतो. 
 • आरोग्य विमा किती महत्वाचा आहे हे लक्षात आलंच असेल. याबरोबर आपल्या कुटुंबाच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी आयुर्विमा, मुदतीचा विमा असे विमाप्रकरही महत्वाचे आहेत.
 • आर्थिक नियोजन करताना त्यामध्ये विमा व गुंतवणूक या दोन्ही गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे. सध्या नव्याने  गुंतवणूक करणं कठीण असलं तरी आहेत त्या गुंतवणूका मोडू नका. त्या तशाच राहाव्यात म्हणून प्रयत्न करा. परिस्थिती कठीण आहे, पण त्याला धीराने तोंड देणे आवश्यक आहे. 

४. कर्ज व्यवस्थापन:

 • सर्वसामान्य माणसे ‘गृहकर्ज’ व ‘वाहनकर्ज’ घेतात. क्वचितप्रसंगी वैयक्तिक कर्ज घेतले जाते. खरंतर गृहकर्ज वगळता इतर कर्ज शक्यतो घेऊ नयेत. जर काही कारणांनी घेतलीच तर ती लवकरात लवकर फेडावीत.
 • कोणत्याही कर्जाचे हप्ते चुकवू नका. गृहकर्ज वगळता इतर कर्ज फेडायचा प्रयत्न करा. संपूर्ण परतफेड शक्य नसेल तर किमान शक्य तेवढी वाढीव रक्कम कर्जखात्यात भर. 
 • क्रेडिट कार्डचा वापर शक्यतो टाळा. कारण यामुळे आपण फक्त आजचं मरण उद्यावर ढकलत असतो. तसंच त्यामुळे खर्चाचा अंदाज येत नाही. 

५. आर्थिक परिस्थितीचा आढावा: 

 • दर महिन्याच्या अखेरीस आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्या. सद्य परिस्थितीत आपल्या जवळच्या बचतीवर आपण किती महिने आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो याचा आढावा घ्या. 
 • जर तुमच्या हातात फार कमी वेळ असेल, तर लगेचच त्यावर उपाययोजना सुरु करा. जर सध्याचे उत्पन्न कमी असेल, तर पर्यायी उत्पनाचा विचार करा.
 • सध्या काही उत्पन्नच नसेल तर तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होण्याची वाट बघू नका. स्वतःसाठी संधी तयार करावी लागेल. लक्षात घ्या या मंदीतही अनेकांनी आपले संसार सावरून उत्तम कमाई केली आहे. गरज आहे ती योग्य दृष्टीकोनाची. 
 • सर्वात महत्वाचं म्हणजे एका रात्रीत श्रीमंत करणाऱ्या कोणत्याही योजनेला फसू नका जसं मंदीमध्ये नशीब घडवणारे असतात, तसंच मंदीमध्ये संधी साधून दुसऱ्याचं नशीब बिघडवणारे पण असतात. 

विशेष लेख: Cyber Crime: २०२१ मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होणार?

सध्याचा काळ खडतर असला तरी जगण्याचा प्रवास आपल्याला करावाच लागणार आहे.  या संकटात तुम्ही एकटेच नाही तुमच्यासारखे अनेकजण अडकलेले आहेत. प्रत्येक गोष्टीला अंत असतो तसंच हा वाईट काळही संपेल फक्त थोडा धीर धरा. आशावादही रहा. दुःखातही  आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Coronavirus and Financial Management in Marathi, Coronavirus and Financial Management Marathi Mahiti, Coronavirus and Financial Management Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.