Reading Time: 3 minutes

वाईट सवय लागू नये म्हणून आपण लहानपणा पासूनच प्रयत्न करत असतो. स्वतःला आणि आपल्या जवळच्या माणसांना चांगल्या सवयी लागल्याने त्यांचे आयुष्य सुकर होईल अशी आपली धारणा असते. टीव्ही, मोबाईल याचा बरोबरीने २१ व्या शतकात लागणाऱ्या वाईट सवयींमध्ये अजून एक महत्वाची सवय म्हणजे- ‘चालढकल करणे’. 

तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

आश्चर्य वाटेल पण ही मोठी समस्या आहे. “कल करे सो आज, आज करे सो अब” हा सुविचार म्हणून बरा वाटतो, पण वास्तवात मात्र आपण “आज करे सो कल करे, कल करे सो परसो” अशीच परिस्थिती आपल्या पैकी काही लोकांची असेल, त्यांना सांगणं गरजेचं आहे की ही एक धोक्याची घंटा आहे. 

तुमची दिरंगाई करण्याची सवय तुमचं आयुष्य बदलू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा! तुम्हाला जाणून घ्यायचंय की दिरंगाई करणे का संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे तर हे नक्की वाचा-

कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?

१. तुम्ही विश्वास गमावता –

  • तुम्ही दिलेले काम जेव्हा वेळेत पूर्ण करत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या शिक्षक, जेष्ठ कर्मचारी, थोर-मोठे यांचा विश्वास गमावता, हे विसरू नका. आपल्याला आपली सामाजिक आणि कामाच्या ठिकाणची प्रतिमा फार महत्वाची असते. आणि जर तुम्ही लोकांचा विश्वास गमावत आहात तर तुमची प्रतीमा डागाळली जात आहे हे लक्षात घ्या. जो विश्वास मिळवायला तुम्हाला कदाचित संपूर्ण आयुष्य खर्ची करावं लागलं असेल तो विश्वास तुमच्या एका सवयी मुळे धुळीस मिळू शकतो. आणि असा धोका घ्यायला नक्कीच कोणी तयार नसेल. 

२. वेळेचा अपव्यय-

  • जे काम तुम्ही केव्हा तरी पूर्वीच करू शकला असता ते करायला तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेताय, तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ वाया घालवत आहात हे नक्की. 
  • स्पर्धेच्या या जगात तुमचं  वाया गेलेलं एक मिनिटसुद्धा आयुष्यभराची किंमत मोजायला लावू शकतो. एकाच कामात अडकून राहिलात, तर तुमच्या हातात नवीन काम यायला जास्त वेळ लागेल, तोपर्यंत तुमचे स्पर्धक मित्र तुमच्याहून फार पुढे निघून गेलेले असतील. 
  • कामात दिरंगाई करताय, याचा अर्थ तुम्ही विजेत्यांच्या यादीतून बाद होताय हे लक्षात ठेवा.

नोकरी जाईल याची सारखी भीती वाटते? मग हे वाचा…

३. तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते –

  • एका पदासाठी अनेकांची चुरस लागलेली असू शकते. अशा वेळी जो सर्वोत्कृष्ट तोच त्या पदासाठी लायक हे खासगी क्षेत्रातील वास्तव आहे. 
  • तुम्ही कामात सतत दिरंगाई केलीत, तर तुमच्या नोकरीवर ग्रहण लागेल आणि तुमची जागा कोणातरी उत्तम कर्मचाऱ्याला दिली जाण्याची शक्यता आहे. 
  • तुमची एक सवय तुमचा पोटावर पाय देऊ शकते.

कसे कराल ऑफिसच्या कामांचे नियोजन?

४. तुम्ही संधी गमावत आहात-

  • काही संधी एका मर्यादित काळापर्यंतच तुमच्यासाठी उपलब्ध असतात. तुम्ही तो वेळ गमावताय, तर तुमच्या हातून ही संधी गेली म्हणून समजा. 
  • तुम्हाच्या कोणत्या परीक्षेची तारीख किंवा प्रवेशिका भरण्याची शेवटची तारीख किंवा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख अशी कोणतीही प्रशासकीय संधी तुम्ही दिरंगाईमुळे गमावलीत, तर किती पैसे दिले किंवा पश्चात्ताप केलात तरी तुमच्यासाठी नियम बदला जाणार नाही आणि तुमच्या हातातून ती संधी गमावलेली असेल.

व्यायाम – आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा भाग

५. तुमच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो –

  • फक्त कामाच्या बाबतीत नाही, तर तुम्ही तुमच्या तब्येतीकडे जर दुर्लक्ष करत असाल, तर तुमचा जीव धोक्यात धोक्यात घालत आहात. 
  • आरोग्य सारखी दुसरी संपत्ती नाही. जर छोट्या छोट्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून आज जाऊ उद्या जाऊ असं करत दवाखाण्यात जाणं टाळल आणि उपचार घ्याला उशीर झाला, तर तुमचं आरोग्य तुम्ही गमावता आहात. 
  • इतकंच काय कित्येक नवीन वर्षी व्यायाम करायचा संकल्प आपण करतो आणि थंडी, ऊन, पाऊस अशी कारणं देऊन चालढकल करतो आणि एक दिवस आजार जडल्यावर आपल्याला जाग येते.

तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

६. भविष्य अंधारमय आहे- 

  • जी व्यक्ती वेळच्या वेळी काम पूर्ण करत नाही, चालढकल करते, त्याचे भविष्याविषयीचे नियोजन कोलमडून जाते आणि एक एक दिवस उशीर करत भविष्य फक्त रखडलेली कामे करण्यात व्यतीत होते, म्हणून अशा लोकांची भविष्य अंधारात आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. या वर्षाची सुरवात काही मोठ्या, आकर्षक संकल्पाने करण्याऐवजी साधा सोपा पण जो आपण पूर्णत्वास नेऊ, असा संकल्प करून करू शकतो. चालढकल करणे थावायचं आहे, हा या नवीन वर्षाचा नवा संकल्प करता येईल. नियम अगदी सोपा आहे. प्रत्येक कामाला एक वेळ नेमून द्यायची आणि त्या वेळेच्या आत ते काम काहीही करून पूर्ण करायचे.

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –