तणावमुक्त गृह कर्जाने बनवा आपल्या मालकी हक्काचे घर

Reading Time: 3 minutes आपण नोकरीला लागलो की आपलं पहिलं स्वप्न असतं , ते म्हणजे शक्य तितके लवकर आपले स्वतःचे घर विकत घेण्याचे. अशावेळी नोकरीच्या सुरवातीच्या काळात पैशाची थोडीफार जमवाजमव केल्यानंतरही, प्रत्येकालाच  गृह कर्ज घेण्याची  गरज भासतेच. काही जण गृहकर्जाच्या मोठाल्या मासिक हप्त्याने घाबरतात. माझा स्वतःचा अनुभव आहे की आपण घर कर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे कारण ८.१५ ते ८.४० % इतक्या कमी व्याजाने, तेही अगदी २०-२५ वर्षे मुदतीचे गृह कर्ज, गृहनिर्माण कर्ज कंपनी आपल्याला देते. २०-२५ वर्ष इतक्या दीर्घ मुदतीमध्ये भरावयाचा कर्जाचा हप्ता नक्कीच आपल्याला तणावाखाली ठेवतो. 

कर्ज घेतलंय? व्याजदर तपासा!

Reading Time: 3 minutes गृहकर्ज घेऊन वर्षानुवर्षे ईएमआय (EMI) भरत असणाऱ्या अनेक ग्राहकांना आपण किती दराने व्याज भरतोय याचाच विसर पडतो. बाजारात किती दर चालु आहे किंवा आपले क्रेडिट रेटिंग अथवा सिबिल (CIBIL) काय आणि त्यानुसार आपल्याला किती कमी दर मिळू शकतो, किंबहुना अशा कमी दरामुळे दीर्घकाळात केवढा फायदा पदरात पडतो, याची माहिती शोधण्याची तसदी फार कमी लोक घेतात.

ऋण व्याजदराने गृहकर्ज?

Reading Time: 2 minutes घरांच्या वाढलेल्या किमती आणि त्यावरील व्याज यामुळे घर घेणाऱ्याची सर्व मिळकत पणास लागते. आयुष्यातील उमेदीची वर्ष फक्त कर्ज फेडण्यासाठी खर्च होतात, इतर खर्चाना मुरड घालावी लागते. जरी हे कर्ज ८.५% दराने इतक्या कमी व्याजदराने घेतले तरी १ लाख रुपये कर्ज १० वर्षात फेडण्यासाठी साधारणत: दीड लाख, २० वर्षात २ लाख १० हजार तर, ३० वर्षात २ लाख ७५ हजार रुपयांची परतफेड करावी लागते. 

टॉप-अप कर्ज का घ्यावे?

Reading Time: 3 minutes बँकेचे जे ग्राहक नियमित आणि पद्धतशीर कर्जाची परतफेड करतात, ज्यांचा सर्व आर्थिक व्यवहारांचा इतिहास स्पष्ट आहे, त्यांच्यासाठी खास फायदा म्हणून हे कर्ज घेण्याची मुभा त्यांना देण्यात येते. आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही कर्ज दीर्घ कालावधीसाठी घेऊ शकता शिवाय तुम्ही कशासाठी हे कर्ज घेत आहात हेही बँकेला सांगयची गरज नाही. 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाचावा रु. २,६७,२८० रुपये

Reading Time: 2 minutes घर! सर्वसामान्य माणसाचं आयुष्यातलं एक महत्वाचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस जीवापाड प्रयत्न करत असतो. पण घरांच्या गगनाला भिडलेल्या किंमती, महागाई, आर्थिक मंदी अशा आवासून उभ्या राहिलेल्या समस्यांमुळे स्वतःच घर विकत घेण्याचं स्वप्न स्वप्नच राहील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. स्वतःचं घर हे केवळ स्वप्न नाही, तर ती एक मूलभूत गरज आहे, हे ओळखून सरकारने मध्यमवर्गीयांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारी एक योजना सुरू केली. ती योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री आवास योजना’.

कर्जमुक्त कसे व्हावे – भाग २

Reading Time: 4 minutes कर्जमुक्तीसाठी नेमके काय करावे? हा प्रश्न नेहेमी सर्वांना पडलेला असतो. त्याचाच वेध घेणाऱ्या लेख मालिकेतील हा दुसरा लेख. खर्च करण्यासाठी किंवा एखादी मालमत्ता विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतील तर बँकांकडून कर्ज घेतले जाते. याबदल्यात मासिक परतफेड मात्र व्याजासहित करावी लागते.“आपल्याला गरज आहे म्हणून कर्ज घ्यायचे की बँक कर्ज देते आहे म्हणून आपल्या अनावश्यक गरजा वाढवायच्या?”  याचा विचार न करता घेतलेले कर्ज तुम्हाला “कर्जबाजारी” बनवते.

श्रीमंतीचा मार्ग – चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक

Reading Time: 3 minutes आपण गुंतवणूक आणि कष्ट करून पुढच्या पिढ्यांची सोय करायची असं आहे का? अजिबात नाही! यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वयाच्या २५ व्या वर्षी कमवायला लागलेल्या व्यक्तीलासुद्धा पुढची ३५ वर्षं गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. म्हणजे प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात ७ वेळा मुद्दल दुप्पट करण्याची संधी असते. एखादी रक्कम ७ वेळा दुप्पट झाली तर तिचं मूल्य किती होऊ शकतं? उत्तर आहे – तब्बल १२८ पट! यालाच म्हणतात ‘चक्रवाढीची जादू’ (Magic of Compounding).

कर्जरोखे (Debt Fund) योजनांचे कामकाज कसे चालते?

Reading Time: 5 minutes म्युच्युअल फंडाच्या डेट फंड किंवा कर्जरोखे संबंधित योजनांची सोप्या शब्दात व्याख्या करायची झाल्यास आपण म्हणू की व्याजाने पैसे देणे. यात म्युच्युअल फंड, कर्जदाराकडून मिळालेले व्याज किंवा परतावा आपल्या गुंतवणूकदारांना भांडवलवृद्धीच्या स्वरूपात देतात. म्युच्युअल फंडात १२ प्रकारच्या डेट फंड किंवा कर्जरोखे प्रकारच्या योजना असतात. या सर्व १२ प्रकारची वर्गवारी त्या योजनेमध्ये असलेल्या निरनिराळ्या कर्जरोख्यांच्या एकत्रित मुदतपूर्ती कालावधीवर अवलंबून असते.

काय आहे मुदत ठेवींचे गणित?

Reading Time: 3 minutes गुंतवणूकदारांमध्ये मुदतठेवी फार लोकप्रिय आहेत. लोक बऱ्याचदा पाव/अर्धा टक्का व्याज कुठे जास्त मिळेल ह्यावर वेळ घालवताना दिसतात. पण महागाई आणि आयकर यांच्या पश्चात आपल्याला नक्की किती परतावा मिळतो याचा विचार फार कमी जण करतात.