आयटीआर दाखल केला नाही? ३१ डिसेंबर पूर्वी फाइल करून दंडाची रक्कम वाचवा

Reading Time: 3 minutesकलम २४F नुसार आयकर कायदा २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून जास्त कडक करण्यात आला आणि मूल्यांकन वर्ष २०१८-१९ पासून तो जास्त प्रभावीपणे अंमलात आला. आपले उत्पन्न जर करपात्र मर्यादित रकमेपेक्षा कमी असेल तर आपण वेळेत उत्पन्न कर भरून उशीराची फी भरणे टाळू शकतो. ३१ ऑगस्ट ही तुमची  इन्कम टॅक्स  रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याची शेवटची तारीख होती. पण तरीही आपण रिटर्न भरला नसेल, तर दंड टाळण्यासाठी आपण ३१ डिसेंबर पूर्वी भरणे आवश्यक आहे. 

करोडपती भारतीयांची संख्या लाखापेक्षाही कमी?

Reading Time: < 1 minuteसेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने म्हणजेच सीबीडीटीने (CBDT)नुकतीच आयटीआर दाखल केलेल्या नागरिकांची आकडेवारी  प्रसिद्ध केली. 

इन्कम टॅक्स रिफंड कधी आणि कसा मिळवाल?

Reading Time: 5 minutesआयकर परतावा भरून झाल्यावर आत अनेकजण रिफंडची रक्कम कधी जमा होणार, या विचारात असतील. अनेकदा कॅल्क्युलेशन चुकल्यामुळे किंवा घाईगडबडीत जास्तीचा ॲडव्हान्स टॅक्स भरला गेल्यास अथवा जादा टीडीएस कपात झाली असल्यास, आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करून ही जास्तीची रक्कम आयकर विभागाकडून करदात्याला परत मिळते. 

आधार क्रमांकाच्या सहाय्याने आता मिळवा पॅनकार्ड !

Reading Time: 2 minutesजुलै २०१९ ला जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले होते. करवसुली,  करबुडाव्यांना चाप, पारदर्शी व्यवहार ही प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून नियमांची आखणी करण्यात आली होती. आयकर विवरण पत्र म्हणजे आयटीआर (ITR) संदर्भात अनेक नवीन नियमांची भर पडली आहे. तसेच, पॅन आधार जोडणीही बंधनकारक करण्यात आली आहे.नवीन नियमांमुळे नागरिकांनी गोंधळून जायचे काहीच कारण नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे. 

महापूर आणि आयकर विवरणपत्रासाठीची (ITR) मुदतवाढ

Reading Time: 2 minutes३१ ऑगस्ट २०१९ ही आयकर विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. परंतु सध्या ठिकठिकाणे आलेले महापूर आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन याचा विचार करता, किमान पूरग्रस्तांसाठी आयकर विवरणपत्र (ITR) भरून देण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक होतं. सदर मुदत वाढवून देण्यासाठी कायदेशीर मागणीही करण्यात आली होती. परंतु त्याकडे सरकारकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.

पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल

Reading Time: 2 minutesप्रत्येक भारतीय नागरिक, संस्था, कंपनी यांच्यासाठी पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहेच पण आयकर विभागासाठीही करदात्यांचे पॅन कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल जवळपास सर्वच व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आयकर विभागाला या व्यवहारांवर लक्ष ठेवणे व त्याद्वारे करदायित्व तपासणे सहज शक्य होऊ शकते. २०१९ च्या अर्थसंकल्पात पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या बदलांना संसदेत मंजुरी मिळणे बाकी आहे परंतु ते विचाराधीन असल्याने लवकरच हे बदल लागू करण्यात येतील.  

आयटीआर: मुदतवाढ मिळाली आता तरी आळस झटकून ‘आयटीआर’ भरा 

Reading Time: 2 minutesसन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख  होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे करदात्यांकडून मुदत वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. ही मागणी विचारात घेऊन आयटीआर दाखल करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. 

बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’

Reading Time: 2 minutesकर हा शासनाच्या उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. आपला कर प्रामाणिकपणे भरणे हे प्रत्येक करदात्याच्या कर्तव्य आहे. अर्थात कायदेशीर मार्गाने करबचत करणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा वापर करणे हा गुन्हा नाही तर अधिकार आहे. परंतु बेकायदेशीर मार्गाने काहीतरी जुगाड करून करदायित्व टाळणाऱ्या तमाम ‘करबुडव्यांना’ चाप बसण्यासाठीच्याउपाययोजना करून, त्यांना ताळ्यावर आणण्याच्या दृष्टीने  या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे.

आयटीआर: आयकर रिटर्न भरण्यासाठीची १० महत्त्वाची कागदपत्रे

Reading Time: 3 minutesजून जुलैचा सिझन अनेकांसाठी कंटाळवाणा असतो. भरपूर सुट्टीनंतर मुलांची शाळा सुरु होणार असते. भर पावसात वह्या-पुस्तके दप्तर ई शालेय वस्तूंची खरेदी, ॲडमिशन प्रोसेस हे सर्व चालू असत आणि त्यात भरीस भर म्हणून आयकर रिटर्न (ITR) भरण्याचं टेंशन. रिटर्न फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. पण  रिटर्न फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रांची माहिती करुन घेतली तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होऊन जाईल. आजच्या लेखात आपण आयकर रिटर्न भरण्यासाठी लागणाऱ्या १० महत्वाच्या कागदपत्रांची माहिती घेऊया. 

‘आयटीआर (ITR)’ कसा भरावा?- पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शन

Reading Time: 3 minutesजूनमध्ये एकीकडे मान्सून पिकनिक ठरत असतात, तर दुसरीकडे आयटीआर (ITR) फाईल करण्याची धावपळ सुरू असते. त्यातही जर कोणी पहिल्यांदाच आयटीआर फाईल करत असेल, तर अचानक आलेला पाऊस जशी तारांबळ उडवतो तशीच तारांबळ आयटीआर भरताना होत असते. आयटीआर भरताना खरंतर गोंधळून जायची काहीच गरज नाही. फक्त थोडीशी माहिती जाणून घेतली की आयटीआर भरणं एकदम सोपं होईल.