गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट – आर्थिक नियोजनाची फरफट?

Reading Time: 3 minutes“दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल…” आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानीही झाली, पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही आपण मात करण्यात आपल्याला यश मिळेल.  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरवात होते. अनेकजण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. 

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग २

Reading Time: 3 minutesमागील भागात आपण शेअर बाजाराच्या इतिहासाची माहिती घेतली. या भागात आपण स्टॉक एक्सचेंज आणि ट्रेडिंग व शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. शेअर बाजाराचा गुंतवणूकदारांशी थेट व्यवहार होत नाही. स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ट्रेडिंगचा परवाना असलेल्या व्यक्तीला स्टॉकचे शेअर्स खरेदी किंवा करण्याची परवानगी दिली जाते. आपल्याला एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करावयाचे असतील, तर आपल्या ब्रोकरशी संपर्क साधावा लागतो. 

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग १

Reading Time: 3 minutesसध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्व देशांच्या शेअर बाजाराची अवस्था बिकट झाली आहे. गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. बाजाराची पडझड सातत्याने चालू आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल अगोदरपासूनच नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या आपल्या समाजात याबद्दल गैरसमज वाढत चालले आहेत. पण परिस्थिती समजून घेऊन, पूर्वग्रहदूषित विचारांना बाजूला सारून, शांत राहून बाजार वर येण्याची वाट बघत राहणे एवढेच गुंतवणूकरांच्या हातात असते. लक्षात ठेवा परिस्थिती सतत बदलत असते. उंच शिखरावर गेल्यावर खाली येण्याशिवाय पर्याय नसतो. बाजाराचेही तसेच असते. त्यामुळे घाबरून न जाता बाजार वर येण्याची वाट बघा.  

तरुणांसाठी गुढीपाडवा व नवीन आर्थिक वर्षाचे संकल्प

Reading Time: 3 minutesसर्वसाधारणपणे उच्च शिक्षण पूर्ण होऊन नोकरी व्यवसायास सुरुवात केल्यापाऊन त्यात स्थिरस्थावर होईपर्यंत ३० वे वर्ष चालू होते. तेव्हा या वयोगटातील व्यक्तीने येणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, खरं तर कोणताही मुहूर्त न पाहता लवकरात लवकर काही नवे संकल्प करावेत. 

घर घेण्याची योग्य वेळ कोणती ?

Reading Time: 5 minutesरिअल इस्टेटमधली सध्याची स्थिती खरोखरच गंमतीशीर आहे. तुम्ही जेव्हा एकटेच नवीन शहरात एका नव्या नोकरीत रुजू होता, तेव्हा तुम्ही घर बुक करताना अधिकच सावध असता, कारण घर हे एक अतिशय महाग उत्पादन आहे व अनेक लोक ते आयुष्यात एकदाच खरेदी करतात. 

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

Reading Time: 3 minutesकोरोना व्हायरस भारतात चीन, इटली व इराण सारखा पसरू नये व रुग्ण संख्येत वाढ होऊ नये म्हणून सरकारने मॉल्स, शाळा, कॉलेजेस व गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. साहजिकच आर्थिक उलाढाल थंडावणार आहे. शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांची विक्री कमी होऊन नफ्यावरचा विपरीत परिणाम नक्की आहे. याचाच धसका शेअर बाजाराने घेतला असून, गेल्या काही दिवसांपासून निफ्टी व सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक कोसळत आहेत.

मन तळ्यात मळ्यात “निर्देशांकांच्या” सापळ्यात….

Reading Time: 3 minutesकोविड -१९ (कोरोना व्हायरस) च्या प्रसारामुळे आणि त्याच्या प्रभावांसह जगातील सर्वच बाजारपेठा कमी अधिक प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसत आहे. अद्याप संक्रमणाच्या वेगाने, संक्रमित देशांमध्ये आणि त्या संक्रमणांच्या तीव्रतेशी संबंधित बाजारपेठांवर परिणाम त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे आढळत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून (फेडकडून) अर्ध्या टक्क्याच्या व्याजदर कपती बरोबरच इटालियन सरकारने जाहीर केलेल्या घोषित टाळेबंदीमुळे भांडवली बाजारांना आश्चर्यचकित केले.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २० (अंतिम भाग)

Reading Time: 2 minutes‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदराच्या आजच्या अंतिम भागात आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या फॅक्टशीट” विषयी. फॅक्टशीट म्हणजे एक रिपोर्ट असतो जो प्रत्येक म्युच्युअल फंड दर महिन्याला प्रकाशित करतात. यामध्ये आदल्या महिन्यात झालेल्या कर्जरोखे आणि समभागबाजारातील बदलाचा आढावा दिलेला असतो. जिथे फंड मॅनेजर आपल्याला विदेशी तसेच भारतातील घडामोडींचे विश्लेषण करून त्याचा नजीकच्या काळात म्युच्युअल फंडावर काय परिणाम होईल त्याबद्दल माहिती देतो. 

आपल्या पाल्याच्या भवितव्याचं नियोजन कसे कराल ?

Reading Time: 3 minutesसध्याचा  पालक वर्ग मुलांना चांगले शिक्षण,  चांगली जीवनशैली मिळावी म्हणून झटत असतो. कधी मुलांचे हट्ट पुरवावे लागतात, तर कधी त्यांच्या शाळेच्या आणि क्लासेसच्या फीज  भराव्या लागतात. एकदा मुलं मोठी झाली की या ना त्या कारणाने पैसा लागतच असतो. मग अशा वेळी सगळा आर्थिक भार त्या पालकांवर पडलेला असतो. योग्य नियोजन केल्यास या गोष्टीसुद्धा कुठल्याही आर्थिक भाराशिवाय आनंदाने पेलता येऊ शकतात या लेखामध्ये आपण आपल्या पाल्याच्या भविष्याचं आर्थिक नियोजन कस करू शकतो, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ. 

प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुंतवणूक करणे झाले अधिक सुरक्षित

Reading Time: 2 minutesउद्योगातील तज्ञांच्या मते, भांडवली बाजारपेठेत यशस्वीरित्या मजल मारण्याची गुरुकिल्ली म्हणजे डेटा आणि त्यातील खाचखळगा समजून घेणे. पण हेच मुद्दे गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे कारण ठरू शकतात. कारण कोणत्याही सामान्य माणसाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरील वर्तमान आणि इतिहासातील डेटाचा अभ्यास करणे कठीण आहे. मात्र तंत्रज्ञानामुळे हा गुंता सोडविण्यास मदत झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक वित्तीय मंच गुंतवणुकीचे जग अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाणून घेऊयात या विविध मार्गांबद्दल.