वैयक्तिक अपघात विमा – काळाची गरज !

Reading Time: 6 minutes एका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. हे पाहता वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे.

गृह विम्याच्या या पाच गोष्टी माहीती असायलाच हव्यात

Reading Time: 3 minutes नैसर्गिक आपत्ती कधीच कोणाला सांगून येत नाहीत. भूकंप,महापूर, वादळे, आग लागणे अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळात स्वतःचा जीव सहीसलामत वाचणे हे महत्वाचे आहेच. सध्या महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यात महापूराने थैमान घातले आहे. धुवांधार पाऊस आणि नद्यांची वाढलेली पाणी पातळी यामुळे गावाच्या गाव महापूराच्या पाण्यात बुडाली आहेत. यामध्ये सर्वात जास्त आणि मोठे नुकसान झाले आहे ते राहत्या घरांचे. घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. ही घरे पुन्हा नव्याने उभी करणे हे तर आव्हान आहेच पण अशा काळात घराचा उतरवणे ही सुद्धा काळाची गरज बनली आहे. 

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes सेवानिवृत्तीपश्चात आपल्या आर्थिक समीकरणांमध्ये अमुलाग्र बदल होतो. आता आपली आर्थिक गुंतवणूक हाच मासिक उत्पन्नाचा स्रोत बनतो. त्यामुळे साहजिकच गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि आपली उद्दिष्टे पूर्णपणे बदलून जातात.

पुरापासून घराचे संरक्षण

Reading Time: 3 minutes गेल्या काही वर्षात भारतात नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच घराचा विमा उतरवणे हे या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीसारख्या कठीण काळातदेखील आपल्याला आर्थिक पाठबळ मिळून घर पुन्हा उभारता येईल, ही बाब आपल्याला नवी उभारी देऊन जाते.

आरोग्य विम्यावर बोलू काही…

Reading Time: 5 minutes सर्वच लोक आर्थिक दृष्टीने सक्षम नाहीत, की जे मोठ्या वैद्यकीय उपचारांचा खर्च पेलू शकतील. दुर्दैवाने मग लोक आपले सोने, शेती (प्रॉपर्टी) आणि इतर मौल्यवान गोष्टी विकतात, भविष्य काळासाठी केलेल्या गुंतवणुकीला अशा प्रकारे हात लावला जातो. वेळप्रसंगी इतरांकडून कर्ज घेतले जाते. अतिशय किरकोळ प्रीमियम भरून घेतलेला आरोग्य विमा तुमची जिद्दीने केलेली बचत व भवितव्य सुरक्षित करू शकतो.

पिक विमा योजनांचे महत्व

Reading Time: 4 minutes पिक विमा योजनेविषयी उलटसुलट चर्चा होत असली तरी शेतकऱ्यांना संकटात आधार देण्याची त्यातल्या त्यात व्यवहार्य अशी जगात मान्य असलेली ती पद्धत आहे. त्यामुळे अशा योजनांतील त्रुटी दूर करताना शेतकरी अशा योजनांपासून दूर जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली पाहिजे. 

आहे म्युच्युअल फंड तरी…..

Reading Time: 3 minutes एका खाजगी संस्थेने (YouGuv) केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात गुंतवणूक साधनांमधे मुदत ठेवी पहिल्या क्रमांकावर, विमा योजना दुसऱ्या तर म्युच्युअल फंड योजना तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याखालोखाल सोने, पीपीएफ, शेअर्स असा क्रमांक लागतो. या आठवडयात बाजार आणि म्युच्युअल फंडाबद्दल समाज माध्यमांवरून इतकी नकारात्मकता पसरवली गेली की बाजार पुढील आठवडाभर बंद राहणार, अशी देखील हाळी देण्यात येत आहे. म्हणूनच म्युच्युअल फंडाची थोडी पार्श्वभूमी माहित करून घेण्याचा प्रयत्न या लेखात करू.

कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा तयार कराल?

Reading Time: 4 minutes कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्वाच्या घटकांमध्ये विभागु शकतो. १) दैनंदिन गरजांसाठीचे खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी खर्च ३) दैनंदिन खर्चांसाठी बचत ४) दीर्घकालीन स्वप्नांसाठी गुंतवणूक. या चार घटकांसाठी आपण योग्य नियोजन केले की आपण आपल्या अर्थसंकल्पात यशस्वी झालो असे समजायचे. 

तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल?

Reading Time: 3 minutes प्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असत. कुटुंबातील सदस्यांना आरामदायक आयुष्य मिळावं किंवा त्यांना कुठल्याही आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावं लागू नये याचा प्रयत्न कुटुंबातील प्रमुख किवा प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो. घरातील प्रत्येकाच्या आर्थिक गरजा वेळोवेळी पूर्ण करणे इतकंच त्यात समाविष्ट नाही. त्याशिवायही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्या परिवाराला आर्थिक सुरक्षा देतील.

‘विशेष’ मुलांच्या भविष्याची तरतूद

Reading Time: 3 minutes आयकर कायद्यानुसार विशेष  व्यक्तींना व्यक्तिगत, तर ते ज्यांच्यावर अवलंबित आहेत त्यांना आयकरात काही सूट देण्यात आली आहे. अनेक राज्य सरकारांनी व्यवसाय करातून त्यांना वगळले आहे. त्यांच्या कल्याणासाठी काही सोई सवलती देण्यात आल्या आहेत जसे नोकरी, शिक्षण यात राखीव जागा, परीक्षेसाठी लेखनिक घेण्याची परवानगी, काही विषयात सूट, परीक्षेसाठी जास्त वेळ, कर्ज मिळण्यात प्राधान्य, व्याजात सवलत, प्रवासखर्चात सवलत इत्यादी. या सर्व कल्याणकारी योजना असून यासर्वाचा अशा व्यक्तिंना लाभ घेता येऊ शकतो. अशा विशेष मुलांचे बरेच प्रकार आहेत त्यानुसार प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत.