आहे म्युच्युअल फंड तरी…..

Reading Time: 3 minutesएका खाजगी संस्थेने (YouGuv) केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात गुंतवणूक साधनांमधे मुदत ठेवी पहिल्या क्रमांकावर, विमा योजना दुसऱ्या तर म्युच्युअल फंड योजना तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याखालोखाल सोने, पीपीएफ, शेअर्स असा क्रमांक लागतो. या आठवडयात बाजार आणि म्युच्युअल फंडाबद्दल समाज माध्यमांवरून इतकी नकारात्मकता पसरवली गेली की बाजार पुढील आठवडाभर बंद राहणार, अशी देखील हाळी देण्यात येत आहे. म्हणूनच म्युच्युअल फंडाची थोडी पार्श्वभूमी माहित करून घेण्याचा प्रयत्न या लेखात करू.

खरंच का मी अर्थसाक्षर?

Reading Time: 3 minutesगुंतवणूक क्षेत्रात अनेक क्लिष्ट संज्ञा वापरल्या जातात, त्यांचा अर्थ बऱ्याचशा लोकांच्या डोक्यावरून जातो, त्या सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न फारसा होत नाही, परिणामी गुंतवणूकदाराच्या मनात नेहेमीच काहीशी धाकधूक असते, गुंतवणूक प्रक्रियेवर आपले नियंत्रण नाहीये, समोरच्याचं म्हणणं, त्याचा युक्तिवाद आपल्याला ऐकून घ्यावा लागतोय अशी भावना निर्माण होत असते. आर्थिक साक्षरतेचा आणि अनुभवाचा अभाव ही जरी त्याची लगेच जाणवणारी कारणे असली, तरी ती दूर करण्याबाबतची अनास्था ही अनेकदा गुंतवणूक क्षेत्राविषयीच्या अविश्वासामुळे निर्माण होत असते.

तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल?

Reading Time: 3 minutesप्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असत. कुटुंबातील सदस्यांना आरामदायक आयुष्य मिळावं किंवा त्यांना कुठल्याही आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावं लागू नये याचा प्रयत्न कुटुंबातील प्रमुख किवा प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो. घरातील प्रत्येकाच्या आर्थिक गरजा वेळोवेळी पूर्ण करणे इतकंच त्यात समाविष्ट नाही. त्याशिवायही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्या परिवाराला आर्थिक सुरक्षा देतील.

‘विशेष’ मुलांच्या भविष्याची तरतूद

Reading Time: 3 minutesआयकर कायद्यानुसार विशेष  व्यक्तींना व्यक्तिगत, तर ते ज्यांच्यावर अवलंबित आहेत त्यांना आयकरात काही सूट देण्यात आली आहे. अनेक राज्य सरकारांनी व्यवसाय करातून त्यांना वगळले आहे. त्यांच्या कल्याणासाठी काही सोई सवलती देण्यात आल्या आहेत जसे नोकरी, शिक्षण यात राखीव जागा, परीक्षेसाठी लेखनिक घेण्याची परवानगी, काही विषयात सूट, परीक्षेसाठी जास्त वेळ, कर्ज मिळण्यात प्राधान्य, व्याजात सवलत, प्रवासखर्चात सवलत इत्यादी. या सर्व कल्याणकारी योजना असून यासर्वाचा अशा व्यक्तिंना लाभ घेता येऊ शकतो. अशा विशेष मुलांचे बरेच प्रकार आहेत त्यानुसार प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत.

आर्थिक नियोजनाचे मूलमंत्र

Reading Time: 3 minutesविमा ही गुंतवणूक नव्हे. खरेतर शालेय जीवनापासून अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले जाणे आवश्यक आहे. आता कुठे नववी व दहावीत म्युच्युअल फंडाबद्दल पाठ समाविष्ट केला गेलाय. पोस्टल  व बँक आर. डी., पारंपरिक विमा, मुदत ठेवी, सोन्यातील गुंतवणूक महागाईला पार करू शकत नाही. बँकेत सात टक्के परतावा घेऊन सात टक्यांच्या महागाईला आपण सामोरे कसे जाणार?

सरकारच्या स्वस्त वैयक्तिक विमा योजना

Reading Time: 4 minutesवित्तीय नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्यानेच झाली पाहिजे. कमवित्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याचे कुटूंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे शुद्ध विमा खरेदी करणे.शुद्ध विम्याच्या कालावधीत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षणाइतकी (Sum Insured) रक्कम विमा पॉलीसीत नामनिर्देशन असलेल्या वारसास (Nominee) देय असते. विमा पॉलीसीची मुदत संपल्यानंतर विमा धारक हयात राहिल्यास विमा कवच बंद होते. परिणामी कुठलीही रक्कम देय राहत नाही. शुद्ध विमा ही गुंतवणूक नसून एक खर्च आहे. विमा पॉलीसीची मुदत संपल्यावर कुठलाही दावा करता येत नाही, या कारणामुळे विमा खरेदी इच्छुक या प्रकारचा विमा खरेदी करण्यास उत्सुक नसतात.

आयुर्विम्याबाबतचे १२ गैरसमज

Reading Time: 5 minutesवैयक्तिक आर्थिक नियोजनात आयुर्विमा हा विषय महत्त्वाचा असूनही त्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. आयुर्विम्याचा संबंध मृत्यूशी असल्यामुळे त्यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळेच अनेक चुकीचे समज निर्माण होऊन पसरत राहतात. त्यात विमाविक्रेत्यांनी पिढ्यानपिढ्या वापरलेल्या चुकीच्या मार्गांमुळे भरच पडते.

Investment FAQ : गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न व त्याची उत्तरे

Reading Time: 5 minutesविमा पॉलिसी, गृहकर्ज, म्युच्युअल फंड, एसआयपी, एसडब्ल्यूपी, इत्यादी गुंतवणुकीसंदर्भात पडणारे काही प्रश्न (FAQ) व त्यांची गुंतवणूक सल्लागारांमार्फत दिलेली उत्तरे या लेखात दिलेली आहेत.

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

Reading Time: 3 minutesसर्व अर्थसाक्षर वाचकांना आता थोडं का असेना हायसं वाटत असेल. कारण कर वाचवा, कर वाचवा असे सारखे येणारे मेसेजेस आणि फोन कॉल्स आता बंद झाले असतील. आर्थिक स्वयंशिस्त असणारे किंबहुना त्याहूनही नसणारे सल्लागार समाज माध्यमातून किती तरी मोठया प्रमाणात ह.भ.प. असल्यासारखे प्रबोधन करत असतात. या समाज माध्यमी मंडळीच बर असतं पहिली पोस्ट राजकीय विषयावर, दुसरी दुष्काळावर, तिसरी प्रेरणादायक चित्रफितीची आणि मग एखादी आर्थिक गुंतवणुकीची… जनजागृती केल्याचं तेवढंच समाधान मिळतं एवढीच यांची शुद्ध भावना.

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा

Reading Time: 4 minutesएन्डोमेंट किंवा मनीबॅकसारख्या पारंपरिक आयुर्विमा पॉलिसी आपल्याला कधीच पुरेसं विमासंरक्षण देऊ शकत नाहीत. बहुतांश वेळा त्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करबचतीसाठी म्हणून विकल्या जातात. म्हणून या पॉलिसी गळ्यात बांधण्यासाठी जे दीर्घकालीन गुंतवणूक आणि आकर्षक परताव्याचं गाजर आपल्याला दाखवलं जातं, त्याचा परामर्श घेऊ.