कोरोना व्हायरसचे पृथ्वीवर झालेले परिणाम

Reading Time: 3 minutesकोरोना व्हायरस हा जीवघेणा विषाणू चीनच्या वुहान शहरापासून जगभरात पसरला. हवाई मार्गाने येऊन याने भारतातही पाय पसरले. संपूर्ण पृथ्वीवर या रोगाने थैमान मांडले आहे. याला रोखण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधक त्यांचे प्रयत्न करत आहेतच, पण अद्याप यावर योग्य इलाज मिळाला नाही. कोरोनाचे गंभीर परिणाम पृथ्वीवर प्रत्येक सजीव जातीवर दिसून येत आहे. या महामारीचा पृथ्वीवर व सजीवांवर काय परिणाम होत आहे, ते आपण जाणून घेऊ. 

“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesकोविड-१९ कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अनेक उद्योग- व्यवसाय बंद आहेत. शक्य ते व्यवसाय घरून ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. नोकरदार वर्गालाही घरून ऑनलाईन काम करावे लागत आहे (Work From Home). याच वर्क फ्रॉम होम मध्ये सर्वांत जास्त गाजलेले मोबाईल ॲप आणि सॉफ्टवेअर म्हणजे ‘झूम ॲप. झूमचा वापर करून मिटींग कशी घ्यायची? झूम सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नापास का ठरते ? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया –

कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा

Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा लक्षात घेता, हे लॉकडाऊन अजून वाढवण्यात आले आहे. हा वेळ म्हटलं तर सक्तीचा आणि कंटाळवाणा वाटू शकतो आणि म्हटलं तर याचा सदुपयोगही करता येऊ शकतो. वेबसिरीज, सिनेमे यामुळे वेळ छान जातही असेल, पण या काळात काही आर्थिक नियोजन करता येतं का? याकडेही लक्ष देऊ या.  या लॉकडाऊनच्या काळात, कोणत्या आर्थिक बाबी पहायला हव्यात, याबाबत या लेखातून जाणून घेऊ. 

कोरोना – “देवाची करणी” आणि विमा योजना

Reading Time: 4 minutesकोरोना विषयक माहितीच्या महापुरात आयआरडीए ने कोरोनाचे क्लेम्स मान्य करण्यासंबंधी एक सर्क्युलर काढले आहे. अशी माहिती समाज  माध्यमांतूनही फिरत होतीच. या बाबत अनेकांचा गोंधळ उडाल्याने माझे आकलन येथे स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते. आयआरडीएने प्रसिद्ध केलेले, कोरोनाचे क्लेम्स मान्य करणेसंबंधीचे परिपत्रक हे प्रामुख्याने ‘आरोग्य विमा’ (Medical Insurance) सेवांबाबत आहे.

कोरोना, आर्थिक पॅकेज आणि ईपीएफचा संभ्रम

Reading Time: 2 minutesकेंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी कोविड १९ च्या संकटामुळे आघात झालेल्या उद्योग, व्यवसायांना थोडासा दिलासा देण्याच्या उद्देशाने आर्थिक सवलतींचे पॅकेज जाहिर केले. शंभर किंवा त्याच्या आता संख्या असलेल्या (त्यातील किमान ९०% संख्या ही १५,००० किंवा त्यापेक्षा कमी मासिक वेतन घेणारी असावी), कामगार भविष्य निर्वाह निधी योजनेत नोंदणी असलेल्या उद्योग, व्यवसायांना आणि १५००० पेक्षा कमी मासिक वेतन असणार्‍या कामगार कर्मचाऱ्यांना सहाय्य व्हावे म्हणून तीन महिन्यांसाठी मालक आणि कामगार दोघांच्याही ईपीएफ (EPF) च्या सहभागाची रक्कम सरकार भरणार असल्याचे जाहिर केले.

कर्जाच्या हप्त्याला स्थगिती दयावी का?

Reading Time: 3 minutesकोरोनाने महामंदी सोबतच महामारीचा यक्ष प्रश्न उभा केला. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक हातात हात घालून काम करण्यास सज्ज झाले आहेत. लोकांच्या हाती अडचणीच्या काळात खर्च करण्यासाठी पैसे राहावेत म्हणून ३ महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या मुदतीच्या कर्जांचे हप्ते स्थगित करण्याचा पर्याय कर्जदारांना उपलब्ध करून देण्याची मुभा बँकांना देण्यात आली. आर्थिक भाषेत मॉरेटोरीअम म्हणजे कर्जाची परतफेड पुढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार. परंतु त्यावरून सामान्य कर्जदारांचे बरेच गैरसमज झाले आहेत. आपण हा मुद्दा उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करू.

स्टॉक मार्केट २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४% ची घसरण

Reading Time: < 1 minute१ एप्रिल २०२० च्या प्रतिकात्मक प्रदर्शनानुसार, स्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अंकांनी पुढे आला. तथापि २०२० मधील पहिल्या तिमाहीतील हे आकडे दोन्ही मार्केटसाठी ऐतिहासिक घसरण दर्शवणारे ठरले. १९९२पासून निफ्टीने सर्वात वाईट तिमाही अनुभवली असून २०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक ठरली आहे.

कर्ज परतफेड -कर्जमाफी नाही, तर सवलत !

Reading Time: 2 minutesरिझर्व बँकेचे अलीकडील ‘अर्थव्यवस्थेस गती देणारे निर्णय व त्याचे परिणाम’ यातील कर्ज परतफेड निर्णयाबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असून याबाबत पत्रकात असलेली असंधिग्ध वाक्यरचना, त्याचे वेगवेगळ्या लोकांनी काढलेले अर्थ आणि समाज माध्यमात प्रसारित होणाऱ्या उलटसुलट बातम्या यामुळे यातील घोळ अजून वाढत असल्याने यासंबंधी योग्य ती माहिती नक्की काय आहे व त्याचा नेमका काय परिमाण होतो ते पाहुयात.

कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?

Reading Time: 3 minutesएस.आय.पी मार्फत गुंतवणूक केल्यास आपण जोखीम कमी करू शकतो. मात्र त्या जोडीला चांगला परतावा मिळविण्यासाठी आणखी काय करता येईल ते आपण पाहू. एस.आय.पी मार्फत म्युच्युअल फंडात जोडल्या गेलेल्या नवनवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाबद्दल विश्वास आणखी कसा वाढेल, हा या लेखामागचा उद्देश. 

मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट ! 

Reading Time: 3 minutesकोरोना विषाणू चीनमध्ये कसा उत्पन्न झाला, तो जगात आणखी किती जणांचे बळी घेणार, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था उध्वस्त होणार का, या साथीतून जगाची सुटका कशी होणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घनतेचा (दर चौरस किलोमीटरला ४२५ माणसे) विचार करता जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताचे या संकटात काय होणार, या चिंता सध्या प्रत्येकाला सतावत आहेत. मानवजातीला या अभूतपूर्व चिंतेतून दूर करण्यासाठी आणि जगाची चाके पुन्हा फिरण्यासाठी माणूस प्रयत्नशील आहे आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपला नजीकच्या काही दिवसांचा दिनक्रम ठरविणे, एवढेच आज आपल्या हातात आहे.