आपण अजूनही ठराविक व्याज देणाऱ्या टर्म डिपॉजिट (मुदत ठेव) मध्ये गुंतवणूक करता का?
मग थांबा हे वाचा, जरा विचार करा आणि म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा.
म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार हे चुकीचे आहे. म्युच्युअल फंड मध्ये तब्बल ३६ प्रकारच्या योजना असतात. त्यातील १६ योजना शेअर बाजाराशी अजिबात संबंधित नसतात. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य म्युच्युअल फंड योजना निवडा.
आपली संपत्ती पुढील ३० वर्षात ३० पट बनवण्यासाठी आपली गुंतवणूक फक्त १२% चक्रवाढ व्याजाने वाढीची आवश्यकता आहे. हे शक्य होऊ शकते म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून!
- गुंतवणूक करताना फक्त २% अधिक परतावा देणारा पर्याय निवडल्यास , पुढील ३० वर्षात साधारण १२ पट अधिक संपत्ती जमा होऊ शकते. म्युच्युअल फंड देतात गुंतवणुकीचे अधिक पर्याय जे महागाईवर मात करणारा परतावा देऊ शकतात.
- तुम्ही जर बँकेच्या ५ वर्षे टर्म डिपॉजिट मध्ये पैसे ठेवले तर, महागाई व करकपात लक्षात घेता मुदतीनंतर तुमची मुद्दलही कमी होऊ शकते.
- महागाईवर मात करणारे गुंवणूक पर्याय निवडा. हे पर्याय मिळू शकतात म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीतून!
- वयाच्या ४० व्या वर्षी रु.१०,००० ची एसआयपी चालू करून ६० व्या वर्षी जी संपत्ती निर्माण होईल, तीच संपत्ती वयाच्या २५ व्या वर्षी फक्त रु १,६०० ची एसआयपी चालू करून निर्माण करणे शक्य आहे.
- म्युच्युअल फंडमध्ये आपली व मुलांची दीर्घकालीन एसआयपी चालू करा.
- गेली २० वर्षे ज्यांनी कलम ८०क (Section 80C) मर्यादा पात्र गुंतवणूक पीपीएफ मध्ये केली त्याची वाढ रु. ३५ लाख झाली. मात्र ज्यांनी म्युच्युअल फंडच्या ईएलएसएस (ELSS) मध्ये गुंतवणूक केली, त्यांची गुंतवणुकीतील वाढ साधारण रु. १.२५ करोड झाली.
- म्युच्युअल फंडचे ईएलएसएस ८०क अन्वये कर बचतीचा एक उत्तम पर्याय आहे.
- जेष्ठ नागरिकांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून दरमहा, वार्षिक ८-९% रक्कम एसडब्ल्यूपी (SWP) द्वारे काढल्यानंतर ही दीर्घ मुदतीमध्ये मूळ गुंतवणुकीत चांगली वाढ होऊ शकते.
- म्युच्युअल फंडची हायब्रीड फंड कॅटेगरी उत्तम पर्याय आहे.
- गेल्या २३ वर्षात निफ्टी निर्देशांकाने तब्बल ८ वर्षे निगेटिव्ह परतावा दिला, तरीसुद्धा निर्देशांक १० पटीपेक्षा जास्त वाढून ९०९ अंकापासून ११५०० अंक वाढला.
- भारताच्या जोमाने वाढणाऱ्या आर्थिक प्रगतीवर विश्वास ठेवून म्युच्युअल फंड मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा.
- आपण जर ४० लाखाचे २० वर्ष मुदतीचे घर कर्ज घेतले असेल ज्याचा मासिक हप्ता साधारण रु ४०,००० असेल, तर आपण साधारण रु ४,००० ची म्युच्युअल फंड ची एसआयपी (SIP) चालू केली तर २० वर्षाच्या मुदतीमध्ये आपण मासिक हप्त्यापोटी भरलेल्या रकमेइतकी धनराशी एसआयपी मधून उभी करू शकतो.
- कर्ज रकमेच्या १% एसआयपी आपले घर कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत करतात. चक्रवाढ वाढीचा फायदा दीर्घकाळ एसआयपी चालू ठेवल्यास जास्त होतो.
- १६१ म्युच्युअल फंड योजनांनी आपल्या १० वर्षांपूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून कमीत कमी ४ पट संपत्ती निर्माण केली. काही योजनांनी तर अधिक चांगली ६-८ पट संपत्ती निर्माण केली.
अधिक माहितीसाठी आमच्या YouTube चॅनेलचे विडिओ पहा आणि आपले म्युच्युअल फंडचे ज्ञान वाढवा.
(म्युच्युअल फंडातील वाढ हि १५% गृहीत धरली आहे, योजनेतील मागील परतावा पुढेही तसाच राहील याची शाश्वती नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेच्या अधीन असते, योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
– निलेश तावडे ( २० वर्षाचा म्युच्युअल फंड क्षेत्राचा अनुभव )
[email protected], ९३२४५४३८३२
(आपल्या मित्र परिवारामध्ये / कार्यालयात म्युच्युअल फंड बाबत मोफत ६०-९० मिनिटांची कार्यशाळा आयोजित करायची असल्यास आम्हाला संपर्क करा. आम्ही जास्तीत जास्त मराठी बांधवाना म्युच्युअल फंड समजावून सांगू. अर्थसाक्षरतेच्या अभियानामध्ये आपणही सामील व्हा.)
म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती , एस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय ,
उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस , भारतीय स्टॉक एक्स्चेंज आता जर्मनीपेक्षाही सरस
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.